नांदेड : नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय विरोधी विशेष मोहिमेला वेग आला असून, मोहिमेच्या नवव्या दिवशी पोलिसांनी विविध ठिकाणी मोठ्या

नांदेड : नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय विरोधी विशेष मोहिमेला वेग आला असून, मोहिमेच्या नवव्या दिवशी पोलिसांनी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात धाडसत्र राबवत 74 गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत 100 इसमांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, एकूण 66 लाख 15 हजार 853 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
1 मे ते 31 मे 2026 या कालावधीत नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम सुरू असून, त्याअंतर्गत गुटखा विक्री, मटका-जुगार, अवैध दारू विक्री, अवैध वाळू उपसा तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत कारवाया करण्यात येत आहेत. पोलिसांनी दिवसभरात गुटखा विक्रीच्या तीन कारवाया करत आरोपींकडून 52 हजार 418 रुपयांचा गुटखा व इतर साहित्य जप्त केले. संबंधित आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 123 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, या गुन्ह्यासाठी दहा वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे. मटका-जुगार प्रकरणात 41 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये 29 गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून 6 लाख 15 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अवैध दारू विक्री करणार्या 37 इसमांविरुद्ध 33 गुन्हे दाखल करून 8 लाख 975 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय अवैध वाळू उपसा करणार्यांविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून तब्बल 23 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत चार, कोप्टा अंतर्गत तीन आणि इतर अधिनियमांतर्गत विविध कारवाया करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी थेट पोलिसांपर्यंत पोहोचवावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून खबर हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. 91 50 100 100 या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे माहिती देण्याचे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. नागरिकांकडून या हेल्पलाइनला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

COMMENTS