Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड रेल्वे विभागात नव्या गाड्यांची भर; काही सेवांचे नियमितीकरण, प्रवाशांना दिलासा

नांदेड : नांदेड रेल्वे विभागातील प्रवाशांसाठी दिलासादायक घडामोड घडली असून, रेल्वे प्रशासनाने काही नवीन गाड्या सुरू करण्याबरोबरच विद्यमान विशेष गा

रेल्वे रुळांजवळ पिकांचे अवशेष जाळू नका; दक्षिण मध्य रेल्वेचे शेतकरी व नागरिकांना आवाहन
प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांना मुदतवाढ
नांदेड विभागात विशेष तिकीट तपासणी; 4.65 लाखांचा महसूल
हजूर साहिब नांदेड रेल्वे स्टेशन - विकिपीडिया

नांदेड : नांदेड रेल्वे विभागातील प्रवाशांसाठी दिलासादायक घडामोड घडली असून, रेल्वे प्रशासनाने काही नवीन गाड्या सुरू करण्याबरोबरच विद्यमान विशेष गाड्यांचे नियमितीकरण आणि काही सेवांचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर हे बदल टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहेत.
प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन नांदेड-तिरुपती-नांदेड (17633/17634) ही साप्ताहिक एक्स्प्रेस 9 मेपासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे जालना-तिरुपती-जालना (17637/17638) ही साप्ताहिक गाडी 11 मेपासून धावणार असून, मराठवाडा आणि आंध्रप्रदेश यांदरम्यान प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. या दोन्ही गाड्यांमुळे धार्मिक तसेच नियमित प्रवासासाठी मोठी मदत होणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, पूर्णा-जालना-नांदेड (77623/77624) ही पूर्वी विशेष स्वरूपात धावणारी डेमू पॅसेंजर सेवा आता नियमित करण्यात आली आहे. 4 मेपासून ही गाडी दररोज धावत असून, स्थानिक प्रवाशांसाठी हा निर्णय विशेषतः लाभदायक ठरत आहे. यासोबतच नांदेड-रायचूर-परभणी (17663/17664) एक्स्प्रेसचा जालना पर्यंत विस्तार करण्यात आला असून, 5 मेपासून हा बदल अमलात आला आहे. या विस्तारामुळे परभणी, सेलू आणि परतूर मार्गावरील प्रवाशांना थेट रेल्वे सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र, या बदलांच्या पार्श्वभूमीवर परभणी-नांदेड (17659) पॅसेंजर सेवा बंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे काही प्रवाशांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असली, तरी एकूणच सुधारित रेल्वे सेवांमुळे नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली परिसरातील प्रवास अधिक जलद, सुलभ आणि कार्यक्षम होणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

COMMENTS