किनवट : शहरातील महात्मा बसवेश्वर चौक येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी व

किनवट : शहरातील महात्मा बसवेश्वर चौक येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून महामानवास अभिवादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात किनवटच्या प्रथम नगराध्यक्षा सुजाताताई येंड्रलवार यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. याप्रसंगी बोलताना त्यांनी समाजाच्या भावनांची दखल घेत महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी, समाजाच्या मागणीनुसार शहरात मुख्य ठिकाणी त्यांच्या भव्य पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. यामध्ये प्रामुख्याने: युवानेता क्रांती केराम, माजी नगराध्यक्ष: आनंद मच्छेवार, व्यंकटराव नेमानीवार, के. मूर्ती. युवा नेतृत्व करण येंड्रलवार, भाजपा नेते सुधाकर भोयर, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार व अभय महाजन. संतोष मरसकोल्हे, प्रवीण राठोड, प्रभू कोल्हे, स्वागत आयनेनीवर, मारुती मुनेश्वर, ज्योतिबा गोणारकर, बालाजी धोत्रे, सतीश नेमानिवार, श्रीनिवास यादवराव नेमानीवार, डॉ. चिन्नावार, दिलबर भदाणे. शिवसेना शहरप्रमुख प्रशांत कोरडे, राजू सातूरवार यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा बसवेश्वर यांच्या ’कायकावे कैलास’ या संदेशाचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांना मानवंदना अर्पण केली.

COMMENTS