पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाब
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत बोलताना एक मिश्कील टिप्पणी केली आणि सभागृहात एकच हशा पिकला.मोदी म्हणाले, “तुमच्या मनात काही ना काही चालू असेल… मी बागेश्वर बाबा नाही, पण काही ना काही चालू असेल,” असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना मिश्कीलपणे टोला लगावला.प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न आणि पुढची वाटचाल वेगळी असते. कुणाला स्टार्टअप सुरू करायचं असेल, तर कुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल, असं मोदी म्हणाले.तसंच IIT दिल्लीतील पहिल्या दिवसापासून ते दीक्षांत समारंभापर्यंतच्या आठवणी विद्यार्थ्यांच्या कायम सोबत राहतील. हॉस्टेलमधील किस्से, स्पर्धा आणि जुन्या आठवणी भविष्यात त्यांना ऊर्जा देतील, असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.“आजचा क्षण जगून घ्या,” असा सल्ला देत मोदींनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS