Homeताज्या बातम्या

श्रीलंकेविरुद्धच्या गॉल टेस्टसाठी देवदत्त पडिक्कलचा दावा मजबूत; सराव सामन्यात दमदार शतक!  

  श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. देवदत्त पडिक्कलने सराव सामन्यात दमदार शतक ठोकत तिसऱ

सौरव गांगुली आणि अंजुम चोप्रा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये
लॉर्ड्सवर रोहित शर्माचे ऐतिहासिक शतक; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीरकोहली-बुमराह पुनरागमन, यशस्वी जैस्वालला मात्र वगळले
श्रीलंका विरूद्धच्या गॉल टेस्ट सामन्यात देवदत्त पडिक्कल दावा मजबूत, सराव सामन्यात दमदार शतक ठोकलं - Marathi News | Devdutt Padikkal strengthens No 3 position with ...

  श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. देवदत्त पडिक्कलने सराव सामन्यात दमदार शतक ठोकत तिसऱ्या क्रमांकासाठी आपला दावा मजबूत केला आहे.श्रीलंका इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कलने केएल राहुलसोबत डाव सावरला. दोघांनी 96 धावांची भागीदारी केली.यानंतर पडिक्कलने शानदार फलंदाजी करत 121 चेंडूत 14 चौकारांसह 103 धावा ठोकल्या आणि शतकानंतर रिटायर्ड हर्ट झाला.दरम्यान, ऋषभ पंत अवघ्या 2 धावांवर, तर ध्रुव जुरेल 1 धावेवर बाद झाला. त्यामुळे साई सुदर्शनच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकासाठी देवदत्त पडिक्कलचा दावा आणखी मजबूत झाला आहे.आता गॉल कसोटीत पडिक्कलला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS