Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूर येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध उपक्रम

बेलापूर : येथील ग्रामपंचायत, सावता मंडळ व एम. पी. सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जयंतीचा मुख्य सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडला. यावेळी महात्मा फुले यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर एम. पी. सोसायटी येथेही प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये कै. गणपत (मामा) टेकाडे मंडळ (धार्मिक व सामाजिक योगदान),  कल्पना सुभाष वाघुडे (माऊली वृद्धाश्रम), नवनाथ कुताळ (व्यसनमुक्ती जनजागृती), अशोक राशिनकर (शेती व सहकार क्षेत्र), देविदास देसाई (पत्रकारिता), किशोर राऊत (शेती सल्लागार), ऋषिकेश भागवत (गो-रक्षक), बागवान रफिक (सामाजिक कार्य), एकनाथ रोकडे (अध्यात्मिक कार्य) तसेच कचरू तुकाराम शिंदे (सामाजिक योगदान) यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जयंती सोहळ्यास विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी, सावता मंडळाचे सदस्य, क्रांतीज्योती महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाईत जनप्रबोधनपर भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन- राजेश इंगोले
महात्मा बसवेश्वर समाज परिवर्तनाचे महान विचारवंत : सरडे
वंदना सोनवणे प्रथम; संगीत खुर्ची स्पर्धेत चमकदार यश

बेलापूर : येथील ग्रामपंचायत, सावता मंडळ व एम. पी. सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली.

ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जयंतीचा मुख्य सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडला. यावेळी महात्मा फुले यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर एम. पी. सोसायटी येथेही प्रतिमा पूजन करण्यात आले.

या प्रसंगी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये कै. गणपत (मामा) टेकाडे मंडळ (धार्मिक व सामाजिक योगदान),  कल्पना सुभाष वाघुडे (माऊली वृद्धाश्रम), नवनाथ कुताळ (व्यसनमुक्ती जनजागृती), अशोक राशिनकर (शेती व सहकार क्षेत्र), देविदास देसाई (पत्रकारिता), किशोर राऊत (शेती सल्लागार), ऋषिकेश भागवत (गो-रक्षक), बागवान रफिक (सामाजिक कार्य), एकनाथ रोकडे (अध्यात्मिक कार्य) तसेच कचरू तुकाराम शिंदे (सामाजिक योगदान) यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

जयंती सोहळ्यास विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी, सावता मंडळाचे सदस्य, क्रांतीज्योती महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS