Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंजारवाडीत मनरेगा कामात भ्रष्टाचाराचा आरोप; चौकशी करण्याची बदामराव पंडितांची मागणी

गेवराई : गेवराई तालुक्यातील वंजारवाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) झालेल्या विविध विकासकामांमध्ये मोठ्या

अतिक्रमण धारकांना तात्काळ पीटीआर वाटप करून घरकुल योजनेचा लाभ द्या-आ.विजयसिंह पंडितअमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत पीटीआर प्रश्नावर बैठक
कवडगाव (खेडकर वस्ती) येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात  प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
ईश्वर मानायचा नाही तर जाणायचा – सुश्री वैष्णवी भारतीजी

गेवराई : गेवराई तालुक्यातील वंजारवाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) झालेल्या विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.
याबाबत बदामराव पंडित यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांना निवेदन दिले आहे. निवेदनात वंजारवाडी गावातील अनेक सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही कामे प्रत्यक्षात पूर्ण न होता कागदोपत्री दाखविल्याचा दावा करण्यात आला आहे. निवेदनानुसार, चिरखा वस्तीतील सिमेंट रस्ता, मारोती मंदिर ते येवले यांच्या घराकडे जाणारा रस्ता, वंजारवाडी ते यादव यांच्या शेताकडे जाणारा रस्ता तसेच वंजारवाडी ते रांजणी शिव रस्ता पवार यांच्या शेताकडे ही कामे बोगस दाखवून लाख रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे असा आरोप करून, तसेच खालील कामे पुस्तकी मोजमाप करून झालेली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यामध्ये वंजारवाडी ते शिवाजी चोरमले यांच्या शेतापर्यंत रास्ता एक किलोमीटर, विश्वनाथ पवार ते राजेश हरकुट यांच्या शेतापर्यंत रस्ता एक किलोमीटर, वंजारवाडी तलाव ते विठ्ठल गड विहिरीपर्यंत रस्ता एक किलोमीटर भाग एक , तसेच भाग दोन, वंजारवाडी ते दाभाडे यांच्या शेतापर्यंत एक किलोमीटर आदी कामांचा समावेश आहे. यामध्ये सुद्धा अनियमित्ता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात उपसरपंच शोभा दिनकर पवार व ग्रामस्थांनी यापूर्वीही गटविकास अधिकारी, गेवराई यांच्याकडे तक्रार दिली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस चौकशी झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय समिती स्थापन करून मनरेगा अंतर्गत झालेल्या सर्व कामांची तात्काळ चौकशी करण्यात यावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बदामराव पंडित यांनी केली आहे.

COMMENTS