Homeताज्या बातम्या

रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना अमेरिकेचा 100% टॅरिफचा धक्का? भारतावर काय परिणाम होणार?

भारत-अमेरिकेच्या व्यापार संबंधांमध्ये रशियन तेलाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अमेरिकेच्या सिनेटने रशिया आणि इराणवरील आर्थिक दबाव वाढवणाऱ्या वि

महाबळेश्‍वर येथून वेण्णा नदी संवाद यात्रेचा उत्साहात प्रारंभ
संगमनेर : ‘उडान’ उपक्रमातून पोलिसांनी रोखला बालविवाह
पर्यटन केंद्राच्या निकृष्ट कामाची चौकशी होणार; मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची वन विभागाला कारवाईचे आदेश
अमेरिकेने लादलेला अति. २५ टक्के टॅरिफ रद्द; रशियाकडून तेल खरेदी : भारत अमेरिकेकडून ५०० अब्ज डॉलरची खरेदी करणार

भारत-अमेरिकेच्या व्यापार संबंधांमध्ये रशियन तेलाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अमेरिकेच्या सिनेटने रशिया आणि इराणवरील आर्थिक दबाव वाढवणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली असून, रशियाकडून ऊर्जा खरेदी करणाऱ्या देशांवर 100 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याची तरतूद आहे.मात्र, याचा अर्थ भारतावर लगेच 100 टक्के शुल्क लागू झालं, असा नाही. पुढील प्रक्रियेनंतरच अंतिम निर्णय होणार आहे.भारतासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे कारण गेल्या काही वर्षांत भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त कच्चं तेल खरेदी केलं आहे. जर रशियन तेलाची खरेदी कमी करावी लागली, तर इराक, सौदी अरेबिया, यूएई किंवा अमेरिकेकडून तुलनेने महाग तेल आयात करावं लागू शकतं.याचा परिणाम पेट्रोल-डिझेल, वाहतूक खर्च आणि महागाईवर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अमेरिकेने मोठा टॅरिफ लावल्यास भारताच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवरही परिणाम होऊ शकतो.मात्र, अंतिम परिणाम अमेरिकेचा टॅरिफ किती लागू होतो, विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं का आणि भारताची पुढील भूमिका काय असते, यावर अवलंबून असेल.

COMMENTS