Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोलेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; समता परिषद व ओबीसी संघटनेकडून आयोजन

अकोले : महात्मा फुले समता परिषद अकोले व सकल ओबीसी समाजाच्या वतीने शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा अकोले येथे सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माळीझाप येथील श्रेयस दिलीप मंडलिक यांची एमपीएससी परीक्षेत सहाय्यक नगर रचनाकार (श्रेणी-१) या राजपत्रित पदावर नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मार्तंड कचरू भरीतकर यांची आयबीपीएस परीक्षेद्वारे सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ज्युनिअर असिस्टंट पदावर नियुक्ती, विश्वास पांडे यांची सीआरपीएफमध्ये तर प्रतीक पांडे यांची ठाणे शहर पोलिस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षपदी प्रवीण शिंदे, उपाध्यक्षपदी बाळासाहेब वाकचौरे तसेच अकोले शहराध्यक्षपदी शैलेश जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. समता परिषदेचे तालुकाध्यक्ष नवनाथ गायकवाड, अगस्ती संस्थेचे संचालक बाळासाहेब ताजणे, रामनाथ शिंदे, कार्याध्यक्ष बाळासाहेब मेहेत्रे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे तालुका उपाध्यक्ष किशोर झोडगे, मनसे शहराध्यक्ष शिवाजी गायकवाड, नवनाथ पांडे यांच्या पुढाकारातून सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास अकोले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, गुरव समाजाचे जिल्हाध्यक्ष अशोक पांडे, परीट समाजाचे प्रदेशाध्यक्ष मनोज गायकवाड, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रामनाथ शिंदे, बेलदार समाजाचे नेते विष्णू कर्णिक, नाभिक समाजाचे बाळासाहेब मदने, नवनाथ पांडे, दत्ता बनवणे, सोमनाथ बाळसराफ, गुलाबराव मंडलिक, तेली समाज संघटनेचे अशोक शिंदे, कम्युनिस्ट पक्षाचे गणेश ताजने, ज्ञानेश्वर चौधरी, दिलीप मंडलिक, अनिल मंडलिक, सोनार समाज संघटनेचे जग्गू शेठ मैड, मारुती चौधरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महादेव कोळी समजातील जाधव भावकीचा आज स्नेह मेळावा
एकदरेत पावसासाठी महिलांचे महादेवाला साकडेभजन, पूजा व अभिषेक करून वरुणराजाला प्रार्थना
भंडारदरा परिसरातील गावांना धरणाचे पाणी;सर्वेक्षणास मंजुरी ; आठवड्यात प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश

अकोले : महात्मा फुले समता परिषद अकोले व सकल ओबीसी समाजाच्या वतीने शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा अकोले येथे सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी माळीझाप येथील श्रेयस दिलीप मंडलिक यांची एमपीएससी परीक्षेत सहाय्यक नगर रचनाकार (श्रेणी-१) या राजपत्रित पदावर नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मार्तंड कचरू भरीतकर यांची आयबीपीएस परीक्षेद्वारे सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ज्युनिअर असिस्टंट पदावर नियुक्ती, विश्वास पांडे यांची सीआरपीएफमध्ये तर प्रतीक पांडे यांची ठाणे शहर पोलिस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.

याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षपदी प्रवीण शिंदे, उपाध्यक्षपदी बाळासाहेब वाकचौरे तसेच अकोले शहराध्यक्षपदी शैलेश जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

समता परिषदेचे तालुकाध्यक्ष नवनाथ गायकवाड, अगस्ती संस्थेचे संचालक बाळासाहेब ताजणे, रामनाथ शिंदे, कार्याध्यक्ष बाळासाहेब मेहेत्रे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे तालुका उपाध्यक्ष किशोर झोडगे, मनसे शहराध्यक्ष शिवाजी गायकवाड, नवनाथ पांडे यांच्या पुढाकारातून सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास अकोले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, गुरव समाजाचे जिल्हाध्यक्ष अशोक पांडे, परीट समाजाचे प्रदेशाध्यक्ष मनोज गायकवाड, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रामनाथ शिंदे, बेलदार समाजाचे नेते विष्णू कर्णिक, नाभिक समाजाचे बाळासाहेब मदने, नवनाथ पांडे, दत्ता बनवणे, सोमनाथ बाळसराफ, गुलाबराव मंडलिक, तेली समाज संघटनेचे अशोक शिंदे, कम्युनिस्ट पक्षाचे गणेश ताजने, ज्ञानेश्वर चौधरी, दिलीप मंडलिक, अनिल मंडलिक, सोनार समाज संघटनेचे जग्गू शेठ मैड, मारुती चौधरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

COMMENTS