Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुंडलवाडी शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव; फॉगिंगसाठी नगरसेवकांची मागणी

कुंडलवाडी : शहरात सध्या डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्

एफडीए चा अहवाल वास्तव की दिशाभूल करणारा ?
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १९ कामगारांचा मृत्यू; ६ जखमी
अकोलेत कुपोषणाचे सावट गडद;३८ तीव्र कुपोषित, ३३८ मध्यम कुपोषित बालके; अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर नियुक्तीची गरज

कुंडलवाडी : शहरात सध्या डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे.
या संदर्भात नगरसेवक संजय शंकर गोनेलवार यांनी जिल्हा हिवताप अधिकारी, नांदेड यांना निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनात त्यांनी कुंडलवाडी शहरात तात्काळ धूर फवारणी (फॉगिंग) करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशीही विनंती करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याने प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS