Homeताज्या बातम्या

एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ; प्रशासन जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र सज्जछत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसादशिबिरे संपली तरी नागरिकांना सेवांचा लाभ कायम मिळणार – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

बीड : महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत बीड शहरातील सामाजिक न्याय भवन येथे मंडळ विभाग बीडचे समाधा

महिला कला महाविद्यालयात मा. अशोकरावजी पाटील (दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
नीट घोटाळ्यातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णीने स्वतःच्याच इमारतीवर चालवला बुलडोझर
झाडे लावा-झाडे जगवा; पण वाढलेली झाडे वाचविणार कोण?राजुरीवेस ते माळीवेस मार्गावरील झाडांची मोठ्या प्रमाणात छाटणी; नागरिकांमध्ये नाराजी


बीड : महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत बीड शहरातील सामाजिक न्याय भवन येथे मंडळ विभाग बीडचे समाधान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला. शिबिरे संपली असली तरी नागरिकांना महसूल प्रशासनाच्या विविध सेवांचा लाभ सातत्याने उपलब्ध करून देण्यात येईल, असा निर्धार जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाने महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू केले आहे. नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा त्यांच्या परिसरात उपलब्ध करून देणे, प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
शिबिराला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी दिव्यांक गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन रहमान, अपर जिल्हाधिकारी हरीष धार्मीक, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सतीश सोनी, उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची रूपरेषा मांडताना तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी शिबिराचे महत्त्व, उद्देश आणि नागरिकांना मिळणार्‍या सेवांची सविस्तर माहिती दिली. तसेच बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. शिबिरामध्ये महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये डिजिटल सातबारा उतारे, वारस नोंद, फेरफार, मयत खातेदार कमी करणे, भोगवटादार वर्ग दोनचे वर्ग एकमध्ये रूपांतर, पाणी नोंदी, विविध दाखले व प्रमाणपत्रे, केवायसी प्रक्रिया, आधार नोंदणी, अभिलेख दुरुस्ती, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, सेवामित्र प्रमाणपत्र, पानंद रस्ते योजना, गायरान मंजुरी आदेश, घरकुल मंजुरी, शेततळे योजना आदी सेवांचा समावेश होता. विशेषतः अकृषक 7/12 चे स्वतंत्र 7/12 मध्ये रूपांतर तसेच अकृषक वसुलीच्या एकरकमी भरणा योजनेबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. भरणा पूर्ण केलेल्या खातेदारांना प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले. याशिवाय मोफत आरोग्य तपासणी, डिजिटल सातबारा वाटप, विविध योजनांतील प्रमाणपत्रांचे वितरण तसेच संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. शिबिराच्या माध्यमातून महसूल, कृषी, पंचायत, आरोग्य, महिला व बालकल्याण, पुरवठा, भूमी अभिलेख, परिवहन महामंडळ आदी विभागांचे माहितीपर स्टॉल उभारण्यात आले होते. नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या असून संबंधित अधिकार्‍यांनी त्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात मंडळ अधिकारी बाबासाहेब तांदळे यांनी सांगितले की, प्रत्येक खातेदारापर्यंत जाऊन सेवा पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली बीड तालुक्यातील 16 मंडळांमध्ये हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले असून पुढेही नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास प्रशासन कटिबद्ध राहील. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनीही नागरिकाभिमुख उपक्रम राबवून महसूल प्रशासन लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू ठेवला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल बीड तालुक्यातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजना आणि सेवा सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत असल्याचे चित्र दिसून आले.

COMMENTS