Homeताज्या बातम्या

गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन

बीड : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त परळी तालुक्यातील गोपीनाथगड येथे विविध मान्यवरांनी अभिवादन करून त्यांच्या कार्याला वि

शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांवर 100 रुपये बाँडचा अडथळा’300 पेक्षा जास्त मेडिकल प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळलेबाँड व नोटरीची अट दूर करून सर्व मेडिकल प्रस्ताव तातडीने निकाली काढावे : महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेची मागणी
मंत्री पंकजाताईंनी दिलेला शब्द गोपीनाथ गडावरून केला पूर्णदिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या कुटुंबियांना 5 लाखांचा धनादेश सुपूर्दसलीम जहाँगीर यांचा पाठपुरावा ; गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचा हात
तोहीद खान हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावीकामरान खान शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख बीड


बीड : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त परळी तालुक्यातील गोपीनाथगड येथे विविध मान्यवरांनी अभिवादन करून त्यांच्या कार्याला विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समवेत भाजपचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी लोकनेते मुंडे साहेबांच्या स्मृतीस्थळास भेट देऊन अभिवादन केले. या प्रसंगी प्रज्ञा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे, गौरव खाडे, डॉ. ज्योती घुंबरे, भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी, आर्यमन पालवे तसेच अगस्त्य खाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारांचा आणि जनसेवेच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. गोपीनाथगडावर राज्याच्या विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या नेत्याला अभिवादन केले.

COMMENTS