Homeताज्या बातम्याबीड

बिंदुसरा नदीपात्र, ओपन स्पेस व व्यापारी संकुल अतिक्रमणप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेगोरगरिबांवर कारवाई अन् भू-माफियांना अभय का?- डॉ. गणेश ढवळे

शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप करत बिंदुसरा व करपरा नदीपात्रातील अतिक्रमणे, ओपन स्पेस गिळंकृत प्रकरणे तसेच व्यापारी स

मातृत्व सप्ताहा निमित्त बीडमध्ये महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबीरडॉ. शितल भोपळे यांचा पुढाकार; ११ ते १६ मे दरम्यान भोपळे हॉस्पिटलमध्ये आयोजन
समाजसेवेचा गौरव; गौतम कांबळे पद्मपाणि पुरस्काराने सन्मानित
बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा: शेख रमशा तस्कीन ’डी.वाय.पाटील’ मधून एमबीबीएस; बोरफडीकर परिवारातील पहिली डॉक्टर!



शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप करत बिंदुसरा व करपरा नदीपात्रातील अतिक्रमणे, ओपन स्पेस गिळंकृत प्रकरणे तसेच व्यापारी संकुलांमधील बेकायदेशीर बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.18) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विभागीय आयुक्त यांच्यासाठी जिल्हाधिकार्‍यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड, रामधन जमाले, बाजीराव ढाकणे, प्राचार्य डी. जी. तांदळे, डॉ. संजय तांदळे, बाळासाहेब मोरे पाटील, किष्किंधा पांचाळ, सिताबाई भोसले व सिता दहे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांनी आरोप केला की, गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत हातावर पोट भरणार्‍या चहा-नाश्ता चालक, टपरीधारक, फळविक्रेते, फुलहार विक्रेते आणि फेरीवाल्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. मात्र दुसरीकडे बिंदुसरा व करपरा नदीपात्रातील पुररेषेच्या आतील अतिक्रमणे, उद्यान व मंदिरांसाठी राखीव असलेल्या ओपन स्पेसवरील बेकायदेशीर बांधकामे तसेच व्यापारी संकुलांतील अतिक्रमणांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी नगरपालिका अधिकारी, नगररचनाकार, भूमी अभिलेख कार्यालयातील काही व्यक्ती व भू-माफियांच्या संगनमतातून अनेक जागा गिळंकृत करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. बनावट पीटीआर व पीआर कार्ड तयार करून काही जागा स्वतःच्या नावावर करण्यात आल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला असल्याचे आंदोलकांनी सांगितले. कायदा सर्वांसाठी समान असावा. गोरगरीबांवर कारवाई आणि धनदांडग्यांना संरक्षण हे प्रशासनाचे दुटप्पी धोरण थांबले पाहिजे. नदीपात्र, ओपन स्पेस आणि व्यापारी संकुलांवरील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली.

COMMENTS