Homeताज्या बातम्या

हल्ले सुरु राहिल्यास अरब देशांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

कुवेतने इराणवर त्यांच्या डिसॅलिनेशन (समुद्राच्या खार्‍या पाण्याचे गोड पाण्यात रूपांतर करणार्‍या) प्रकल्पाला लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. जर आखा

होर्मुझ सामुद्रधुनी पार करून ‘दिशा’ भारतातनैसर्गिक वायूच्या पुरवठ्याला मोठा दिलासा
अर्थव्यवस्थेला रसातळाला नेणारा अंहकार !
युद्धविराम आणि आशियाई देशांचा सुटकेचा निःश्‍वास
इराणवरील युद्ध: आखातीतील जल निर्जलीकरण संयंत्रांवर हल्ला करण्याचे धोके

कुवेतने इराणवर त्यांच्या डिसॅलिनेशन (समुद्राच्या खार्‍या पाण्याचे गोड पाण्यात रूपांतर करणार्‍या) प्रकल्पाला लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. जर आखाती देशांतील या प्रकल्पांवरील हल्ले वाढले, तर कोट्यवधी लोकांसमोर पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट निर्माण होऊ शकते. आखाती देशांसाठी हे प्रकल्प इतके महत्त्वाचे का आहेत, ते जाणून घेऊया.इराण आणि आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे आता नव्या चिंतेला तोंड फुटले आहे. कुवेतने आरोप केला आहे की, इराणी संरक्षण दलांनी दुसर्‍यांदा त्यांच्या डिसॅलिनेशन प्रकल्पाला लक्ष्य केले. असे हल्ले सुरू राहिल्यास त्याचा परिणाम केवळ कुवेतपुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण आखाती प्रदेशात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण होऊ शकते.आखाती देशांमध्ये नैसर्गिक गोड्या पाण्याचे स्त्रोत अत्यंत मर्यादित आहेत. येथे पाऊस अत्यल्प पडतो आणि हवामान बहुतांश वेळा उष्ण व कोरडे असते. त्यामुळे या देशांतील पिण्याच्या पाण्याची मोठी गरज समुद्राच्या खार्‍या पाण्याचे शुध्दीकरण करून भागवली जाते.चिंतेची बाब म्हणजे, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमध्येही पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत इराण आखाती देशांमधील पाणीपुरवठा विस्कळीत करण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.गल्फ रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, भूजल आणि डिसॅलिनेशनमधून मिळणारे पाणी मिळून या प्रदेशातील सुमारे 90 टक्के पाण्याची गरज भागवली जाते. मात्र, हवामान बदलामुळे भूजलाची गुणवत्ता सातत्याने खालावत असल्याने आखाती देशांची डिसॅलिनेशन प्रकल्पांवरील अवलंबित्व पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे.

COMMENTS