Homeताज्या बातम्या

नांदेडमध्ये आईची हत्या केल्यानंतर मुलाने घेतला गळफास

नांदेड : शहरातील तरोडा नाका परिसरातील राहुल कॉलनीमध्ये शनिवारी रात्री अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने आपल्या आईवर घरातील क्रिकेटची बॅट आण

NEET आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांची धमकी; ‘खिशात ५० ग्रॅम पावडर टाकून आत टाकू’, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसावर कारवाई
जिल्हा बँकेच्या रणांगणात आज निकालाचा थरार; प्रस्थापित धक्का की पुन्हा वर्चस्व?
तामसा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवैध देशी दारूसह दोन जेरबंद, ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त
Nanded Crime News | नांदेडमध्ये तरुणाची गोळी घालून हत्या, वजिराबाद पोलिसांत  गुन्हा दाखल

नांदेड : शहरातील तरोडा नाका परिसरातील राहुल कॉलनीमध्ये शनिवारी रात्री अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने आपल्या आईवर घरातील क्रिकेटची बॅट आणि लोखंडी सळईने हल्ला करून तिची हत्या केल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आईच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राहुल कॉलनीतील चौथरे कुटुंबाच्या घरात रात्री सुमारे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रतीक चौथरे (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या ५० वर्षीय आईवर त्याने घरातील क्रिकेटची बॅट आणि लोखंडी सळईने हल्ला केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. प्रतीकने आईवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या डोक्यासह शरीराच्या अन्य भागांवर गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ती घटनास्थळीच मृत झाली.

त्यानंतर प्रतीक दुसऱ्या खोलीत गेला आणि छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मुलाने आईवर एवढा टोकाचा हल्ला का केला, यामागे नेमके काय कारण होते, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. कौटुंबिक वाद, मानसिक तनाव किंवा अन्य कोणते कारण होते का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

COMMENTS