Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्मशानभूमीतील वाल्मीक तीर्थ ठरतंय आकर्षण

राहुरी/प्रतिनिधी ः तालुक्याचे जेष्ठ नेते जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती अ‍ॅड सुभाषराव पाटील यांच्या प्रेरणा व संकल्पनेतून तालुक्य

कोपरगावच्या भाजयुमोचे तालुकाध्यक्ष गवळी तर शहराध्यक्षपदी साठे
समृद्धीच्या इंटरचेंजला शिर्डी-कोपरगाव इंटरचेंज नाव द्या
पत्रकार दातीर खूनप्रकरणाचा तपास उपअधीक्षक मिटकेंकडे

राहुरी/प्रतिनिधी ः तालुक्याचे जेष्ठ नेते जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती अ‍ॅड सुभाषराव पाटील यांच्या प्रेरणा व संकल्पनेतून तालुक्यातील वांबोरी गावच्या स्मशानभूमीचा दिमाखदार कायापालट झाला असून वांबोरी स्मशानभूमीच्या कामाची व कार्याची जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावांनी आदर्श घेऊन भविष्यात वांबोरी सारख्या स्मशानभूमी सुशोभित करून नवा आदर्श निर्माण करण्याची गरज आहे.
 याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बांबोरी गावाला ब्रिटिश काळापासून महत्त्व आहे. वांबोरी स्मशानभूमीची जागा ज्या ठिकाणी आहे,  तेथे अनेक समाध्या आहेत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी महादेवाची पुरातन मूर्ती व 40 बाय 40 मीटर एवढ्या मोठ्या आकाराची जुनी बारव आहे. तिला शिलालेख आहे. मात्र कळत नाही. हे पुरातन काळातील वाल्मीक तीर्थ क्षेत्र असल्याने या स्मशानभूमीच्या माध्यमातून यासाठी वाल्मीक तीर्थाचे रुपडे पालटले . हे रूप पालटण्यासाठी अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचा निधी आणून हे सुशोभीकरण करण्याचा ध्यास घेतला व या सुशोभीकरणास अखेर त्यांना यश आल्याने वांबोरी गावासह पंचक्रोशीतील जनतेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अ‍ॅड. पाटील यांनी बोलताना सांगितले की, पूर्वी वांबोरी येथे मुन्शीपार्टी होती. तिचे रूपांतर ग्रामपंचायतीमध्ये झाले. सन 1978 पूर्वी जागा दिसेल त्या ठिकाणी अंत्यविधी केला जात होता. तर अंत्यविधी व दशक्रिया विधी देखील येथील बारवाच्या बुडाच्या दंडावर केला जात होता. मी जेव्हा 1978 साली सरपंच झालो. त्यानंतर अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी या ठिकाणी जागा स्वच्छ करून स्मशान भूमीसाठी शेड केली. पूर्वी ओट्यावरच अंत्यसंस्कार केले जात होते. एकाच वेळी तीन अंत्यविधी होतील असे शेड करून पिंजरे लावले. अहमदनगरचे माजी नगराध्यक्ष नवनीत भाई बार्शीकर यांनी नगर येथे अतिशय सुशोभित असे अमरधाम बांधले ते खूप नावाजले. हे मी स्वतः बघितले होते. असेच वांबोरी येथे आपण करावे अशी माझी इच्छा होती. नंतर मी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा सभापती झालो. त्यावेळी मला जिल्ह्यातील अनेक स्मशानभूमी बघायला
मिळाल्या. त्यामुळे नगर सारखी स्मशानभूमी वांबोरीत करण्याचा मी निर्णय घेतला होता. कारण माणूस जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा त्याला कुठे नेले जाते, कुठे पुरले जाते, आणि कुठे जाळले जाते हे त्याला कळत नसतं. प्रत्येकाचं कुटुंब मागील परंपरा पुढे चालू ठेवत असतात. आज वांबोरी स्मशानभूमीत आम्ही पूर्वी खूप झाडे लावली होती. ती झाडे खूप मोठी झाली आहेत. आता या झाडांमुळे तेथे ऊन सुद्धा लागत नाही. या स्मशानभूमीचे काम करताना त्या वेळचे ग्रामसेवक नारायण मोटे यांची मला चांगली साथ लाभली. या सुशोभी करणासाठी भारत सरकारच्या वित्त आयोगाचा निधी, जिल्हा परिषदेच्या वित्त आयोगाचे निधी, पंचायत समितीचा निधी, या निधीचे प्लॅनिंगच्या माध्यमातून येथे हा निधी वापरला व सुशोभिकरण केले आहे. या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेण्याबरोबरच कंपाऊंड, पेव्हर ब्लॉक टाकून परिसर 90% पर्यंत सुशोभीत केला आहे असेही यावेळी पाटील यांनी सांगितले.

COMMENTS