Homeताज्या बातम्या

अंबाजोगाईत अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथेचे आयोजन

अंबाजोगाई: शहरातील माळीनगर येथील श्री संत सावता महाराज मंदिर, इच्छापूर्ती विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान येथे संत शिरोमणी सावता महाराज व संतश्रेष्ठ नाम

महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच रस्ता खचला; कार थेट खड्ड्यात, प्राध्यापक एंगडे थोडक्यात बचावले!
मृदा, जल आणि वृक्ष संवर्धन केले तरच भविष्य उज्ज्वल – जलनायक मयंक गांधीसरस्वती नदी पुनरुज्जीवन कामाचा शुभारंभ; हजारोंच्या उपस्थितीत संवाद मेळावा संपन्न
हरिश्चंद्र गडावर दरड कोसळली; मालाडचे चार पर्यटक गंभीर जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

अंबाजोगाई: शहरातील माळीनगर येथील श्री संत सावता महाराज मंदिर, इच्छापूर्ती विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान येथे संत शिरोमणी सावता महाराज व संतश्रेष्ठ नामदेव महाराज समाधी उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. 5 ऑगस्ट रोजी वीणा व ग्रंथ पूजनाने या धार्मिक सोहळ्याचा शुभारंभ होणार असून बुधवार, दि. 12 ऑगस्ट रोजी काल्याच्या कीर्तनाने समारोप होईल. सप्ताह काळात काकडा आरती, विष्णुसहस्रनाम, गाथा भजन, संत सावता महाराज ग्रंथ वाचन, हरिपाठ, भजन-कीर्तन, प्रवचन व शिवमहापुराण कथा असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शिवमहापुराण कथेचे निरूपण ह.भ.प. बालासाहेब कुलकर्णी करणार आहेत. संत सावता महाराजांचे 17 वे वंशज ह.भ.प. दादा महाराज वसेकर यांची उपस्थिती लाभणार आहे. विविध दिवशी नामवंत कीर्तनकार व प्रवचनकारांची सेवा होणार आहे. दि. 12 ऑगस्ट रोजी ह.भ.प. अच्युत महाराज जोशी यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होईल. यावेळी ह.भ.प. अच्युत महाराज जोशी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथतुला व दिंडी सोहळ्याचे झेंडे उतरविण्याचा कार्यक्रम होणार आहे.या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वितेसाठी संत सावता महाराज भजनी मंडळ, परिसरातील वारकरी, भाविक व नागरिक परिश्रम घेत आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS