बीड: स्थानिक शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर असणार्या सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य् महाविद्यालयात चालू शैक्षणिक

बीड: स्थानिक शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर असणार्या सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य् महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी एम.ए. (मराठी) आणि ’ग्रामीण पत्रकारिता’ या लोकप्रिय व रोजगारक्षम अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या साहित्यिक, भाषिक आणि व्यावसायिक कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी महाविद्यालयाने हे विशेष अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेविषयीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये असे आहेत की, एम.ए. मराठी मराठी भाषेचा सखोल अभ्यास, प्राचीन व अर्वाचीन साहित्याचा परिचय. सर्जनशील लेखन, भाषांतर आणि समीक्षा कौशल्यांचा विकास. स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अभ्यासक्रम. या अभ्यासक्रमात कोणत्याही शाखेतील मराठी ऐच्छिक व द्वितीय भाषा घेतलेला पदवीधर प्रवेश घेऊ शकतो. ग्रामीण पत्रकारीता याअभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये असे आहेत की, ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कुशल पत्रकारांची पिढी तयार करणे. मुद्रित (Print), इलेक्ट्रॉनिक (Electronic) आणि डिजिटल मीडियाचे (Digital Media) प्रात्यक्षिक शिक्षण. वृत्तसंपादन, मुलाखत तंत्र, आणि जनसंपर्क (PR) यांचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहेत. या कोर्सचा कालावधी सहा महिने असून 12 वी उत्तीर्ण असलेल्या कोणत्याही शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. या कोर्ससाठी कोणत्याही महाविद्यालयात प्रवेशीत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार आहे. तरी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. खान ए. एस. यांनी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवाहन केले आहे. तरी प्रवेश घेण्यासाठी डॉ. रामनाथ वाढे मो. क्र. 9767087414, डॉ. लालासाहेब घुमरे मो. क्र. 9823567335 , डॉ. महादेव जगताप मो.क्र. 8668381022 यांच्या संपर्क करावा.

COMMENTS