बीड: बीड विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव ना.पंकजाताई मुंडे आणि ऊ


बीड: बीड विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव ना.पंकजाताई मुंडे आणि ऊर्जा राज्यमंत्री ना.मेघनाताई बोर्डीकर यांची भाजप नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.4) मंत्रालयात भेट घेतली. या भेटीतून बीड मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागातील महत्वाचे प्रलंबित आणि प्रस्तावित विकासकामे मार्गी लागणार आहेत. बीड मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती मिळावी. तसेच शहर आणि ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद, विजेसह इतर प्रश्न मार्गी लागावेत आणि आवश्यक कामांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा व्हावा, या अनुषंगाने डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी नगरसेवक शुभम धूत, नवगण शिक्षण संस्थेचे संचालक आमेर सिद्दिकी, नितीन साखरे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष निखिल शिंदे, शुभम कातांगळे, दिलीप बेद्रे, सुशील जाधव, गोरख यादव आदींची उपस्थिती होती. बीड मतदारसंघात विविध ठिकाणी उभारणार 33 केव्ही वीज उपकेंद्र बीड विधानसभा मतदारसंघातील शहरासह ग्रामीण भागातील विजेचे अनेक प्रश्न डॉ.योगेश क्षीरसागर यांनी ऊर्जा राज्यमंत्री ना.मेघनाताई बोर्डीकर यांच्यासमोर मांडले. त्यांनी डॉ.क्षीरसागर यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत बीड मतदारसंघात विविध ठिकाणी नवीन 33 केव्ही उपकेंद्र उभारणार असल्याची ग्वाही दिली असून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच बीड महावितरण कंपनीच्या अधिकार्यांना दिले आहेत.

COMMENTS