Homeताज्या बातम्या

१६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या जाळ्यात; वेशांतर करून पोलिसांनी रचला सापळा

श्रीगोंदा : तब्बल सोळा वर्षांपूर्वी दाखल झालेल्या जुन्या गुन्ह्यातील एका अट्टल फरार आरोपीला अटक करण्यात श्रीगोंदा पोलिसांना मोठे यश आले आहे. पोली

न्यायालयीन कोठडीतील ३५ आरोपी नाशिक कारागृहात श्रीगोंदा-बेलवंडी पोलिसांची कारवाई
रात्री डीजेवर बंदी; राहुरी पोलिसांची कठोर भूमिका 
श्रीगोंदेत गाळेधारकांशी पोलिसांचा संवादसीसीटीव्ही बसविण्यासह सुरक्षा उपायांवर भर
Shrigonda Crime News,सवयीने केला घात! एकदा पकडले जाऊनही पुन्हा लाच मागितली  आणि... - shrigonda police constable sanjay kale arrested for taking bribe -  Maharashtra Times

श्रीगोंदा : तब्बल सोळा वर्षांपूर्वी दाखल झालेल्या जुन्या गुन्ह्यातील एका अट्टल फरार आरोपीला अटक करण्यात श्रीगोंदा पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष ‘फरार व पाहिजे आरोपी शोध मोहिमे’अंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास गुन्ह्यातील फरार आरोपी उद्धव बाळासाहेब जठार (वय ४०, रा. कौठा, ता. श्रीगोंदा) हा आपल्या राहत्या घरी आल्याची गोपनीय माहिती श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करून आरोपीला ताब्यात घेण्यासाठी तातडीने एक विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले.

या पथकातील पोलीस अंमलदारांनी वेशांतर करून आरोपीच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली. त्यानंतर अत्यंत शिताफीने आणि कोणताही गोंधळ न होऊ देता सापळा रचून आरोपीला राहत्या घरातून ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी गेल्या १६ वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेपासून दूर पळत होता. या यशस्वी कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या गुन्ह्याच्या तपासाला आता मोठी गती मिळणार आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबुर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक खिळदकर व त्यांच्या विशेष पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

COMMENTS