देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात रात्री १० नंतर डीजे, साउंड सिस्टिम तसेच मोठ्या आवाजातील वाद्य वाजवणाऱ्यांविरोधात आता राहुरी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास साउंड सिस्टिम चालक, मंगल कार्यालय मालक तसेच कार्यक्रम आयोजकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दि. ११ मे २०२६ रोजी तालुक्यातील साउंड सिस्टिम चालक, मालक व मंगल कार्यालय चालकांची बैठक घेतली.या बैठकीत रात्री १० नंतर कोणत्याही प्रकारचे डीजे, वाद्य, फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीसाठी वापरल्या जाणाऱ्या ध्वनी उपकरणांचा वापर केल्यास संबंधित साउंड सिस्टिम चालक, मंगल कार्यालय मालक तसेच आयोजकांवर ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले. या निर्णयामुळे रात्रीच्या ध्वनी प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना, विशेषतः वृद्ध व रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

COMMENTS