नवी दिल्ली: एअर इंडियाच्या फुकेत ते दिल्ली प्रवास करणाऱ्या विमानाला दिल्ली विमानतळावर उतरण्याआधी भयानक संकटाला सामोरे जावे लागले. हे विमान आकाशात

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या फुकेत ते दिल्ली प्रवास करणाऱ्या विमानाला दिल्ली विमानतळावर उतरण्याआधी भयानक संकटाला सामोरे जावे लागले. हे विमान आकाशात अचानक ‘एअर टर्ब्युलन्स’ (हवेच्या तीव्र दबावा) मध्ये सापडल्याने १२ हून अधिक प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडच्या फुकेतहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे फ्लाईट क्रमांक AI2379 हे विमान प्रचंड उंचीवर असताना अचानक टर्ब्युलन्समध्ये अडकले. हवेच्या तीव्र दबावामुळे विमान अचानक वेगाने खाली झेपावले. यामुळे विमानात मोठा गलका आणि घबराट निर्माण झाली. हा धक्का इतका भयानक होता की प्रवाशांच्या मानेला दुखापत झाली, तर काहींच्या कानाच्या पडद्यांना इजा होऊन कानातून रक्त वाहू लागले. विमानातील वस्तू अंगावर आदळल्याने काहींची हाडे मोडल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याशिवाय विमानाच्या आतील छताचेही मोठे नुकसान झाले आहे.
एका प्रवाशाच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, विमानात निर्माण झालेल्या प्रचंड दाबाने आणि वेगाने खाली आलेल्या धक्क्याने प्रवासी विमानातील विविध भागांवर जाऊन आदळले.
पायलटच्या प्रसंगावधानाने सुखरूप लँडिंग काही वेळेसाठी विमानात मोठी अफरातफर माजली होती. मात्र, पायलटने अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळत विमानाला दिल्ली विमानतळावर सुखरूप लँड केले. लँडिंगनंतर तातडीने वैद्यकीय पथकाने सर्व जखमींवर उपचार सुरू केले असून, त्यांना विमानतळाजवळील वैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
एअर इंडियाची प्रतिक्रिया एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “प्रवासी आणि चालक दलाच्या सदस्यांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. प्रभावित सर्व प्रवाशांना वैद्यकीय व आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात असून, या घटनेच्या चौकशीसाठी संबंधित यंत्रणांना पूर्ण सहकार्य केले जात आहे.”
एअर टर्ब्युलन्स म्हणजे काय आणि ते का होते? आकाशात हवेचा प्रवाह असमान आणि अनियमित होतो, तेव्हा टर्ब्युलन्स निर्माण होते.
- थर्मल डिस्टरबन्स: जमीन तापल्यामुळे गरम हवा वर जाते आणि थंड हवा खाली येते.
- हवेचा अडथळा: हवेचा प्रवाह पर्वतांना धडकल्याने हवेची गती वर-खाली होते.
- जेट स्ट्रीम: अत्यंत उंचीवर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या गतीमध्ये अचानक फरक पडल्याने आकाशात मोठी अशांतता (Turbulence) निर्माण होते.

COMMENTS