श्रीगोंदा : श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक करून न्यायालयीन कोठडी (एमसीआर) सुनावण्यात आलेल्या ३५ आरोपींना मंगळवारी (दि. ८ जुलै) श्रीगोंदा येथील दुय्यम कारागृहातून कडक पोलीस बंदोबस्तात नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले.श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, संबंधित आरोपींवर खून, दरोडा, गंभीर दुखापत, चोरी, फसवणूक आणि मारामारी यांसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आणि दुय्यम कारागृह प्रशासनाच्या आदेशानुसार त्यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.ही कारवाई जिल्हाधिकारी पंकज आशिया व पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या आदेशानुसार पार पडली. तहसीलदार तथा दुय्यम कारागृहाचे अधीक्षक सचिन डोंगरे आणि श्रीगोंदा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.कारवाईत राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी (पोलीस मुख्यालय), पोलीस निरीक्षक प्रदीप माने (मोबाईल पथक, पोलीस मुख्यालय), श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच जेलर बाबुराव कारखिले यांनी सहभाग घेतला.गंभीर गुन्ह्यातील आरोपींची सुरक्षितपणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.

COMMENTS