Homeताज्या बातम्या

श्रीगोंदेत गाळेधारकांशी पोलिसांचा संवादसीसीटीव्ही बसविण्यासह सुरक्षा उपायांवर भर

श्रीगोंदा : शहरातील शनि चौक परिसरातील व्यापारी व गाळेधारकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशान

यश फाउंडेशनचा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात
झुंबरबाई घोलप यांचे निधन
विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

श्रीगोंदा : शहरातील शनि चौक परिसरातील व्यापारी व गाळेधारकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने गुरुवार (दि. २५ जून) रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले.या बैठकीदरम्यान शनि चौकातील गाळेधारकांच्या विविध अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच परिसरात चोरी, गुन्हेगारी व इतर अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी व्यापाऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी गाळेधारकांना प्रत्येक दुकानासमोर व आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या. तसेच दुकानांमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांव्यतिरिक्त इतर कोणालाही विनाकारण थांबू देऊ नये, असे सांगितले. याशिवाय शनि चौक परिसरातील ‘नो पार्किंग’ झोनमध्ये वाहने उभी करू नयेत, अन्यथा वाहतूक कोंडीसह कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.या सर्व सूचनांबाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये संबंधित गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.या संवाद बैठकीमुळे व्यापारी व पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय वाढण्यास मदत होणार असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी ठेवण्यासाठी अशा बैठका नियमितपणे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

COMMENTS