Homeताज्या बातम्या

वाळूतस्करांची मुजोरी; प्रशासनाचे दुर्लक्ष? जामखेडमध्ये ८५ वर्षीय वृद्धाचा आमरण उपोषणाचा इशारा

जामखेड : तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन देऊन वारंवार पाठपुरावा केला, तरीही परिसरातील बेकायदेशीर

NEET प्रकरणावरून NTA ला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा फटका
कोपरगावात निळवंडेचे पाणी आमदार आशुतोष काळे यांच्यामुळेच आले; माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे यांचा दावा
एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात तांत्रिक बिघाड

जामखेड : तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन देऊन वारंवार पाठपुरावा केला, तरीही परिसरातील बेकायदेशीर वाळूउपसा सुरूच आहे. यामुळे शेतजमिनीचे प्रचंड नुकसान होत असून, प्रशासन वाळू तस्करांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. न्याय न मिळाल्यास आगामी २७ जून रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा पोपट सर्जेराव इंगळे या ८५ वर्षीय वृद्धाने दिला आहे.

इंगळे यांनी जामखेडच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आघी गावात नदीच्या कडेला माझ्या मालकीची गट नंबर ४२ मध्ये शेतजमीन आहे. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे माझ्या शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले असून, माझ्या वयोवृद्ध आणि असहाय्यतेचा गैरफायदा घेतला जात आहे. या वाळूतस्करांकडून आता माझ्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.

या बेकायदेशीर वाळू उपशाबाबत यापूर्वी तहसीलदार जामखेड यांना निवेदन दिले होते, मात्र संबंधित सर्कल तलाठ्यांनी यावर कसलीही कारवाई केली नाही. त्यानंतर न्याय मिळवण्यासाठी तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आदी वरिष्ठ पातळीवर लेखी अर्ज सादर केले, परंतु तरीही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. शेतजमिनीचे होत असलेले नुकसान, बेकायदेशीर वाळू उपसा तसेच वाळू तस्करांकडून मला होत असलेला त्रास तात्काळ थांबवावा, अन्यथा २७ जून २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासनाने वेळीच पायबंद घालावा

बेकायदेशीर वाळू तस्करी ही संपूर्ण राज्य पातळीवरील अत्यंत गंभीर बाब बनली आहे. अनेक ठिकाणी यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तर काही ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा छोट्या घटनांकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले, तर पुढे जाऊन मोठ्या गुन्हेगारी घटना घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घेऊन अशा बेकायदेशीर बाबींना तात्काळ पायबंद घालणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

COMMENTS