Homeताज्या बातम्या

पंढरपूर येथील रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आम आदमी पार्टीचा पाठिंबामाजी सैनिक अशोक येडे यांनी घेतली भेट

शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी पंढरपूर येथे आमदार ठेहळीं झरुरी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आम आदमी पार्टीच

जळगाव जिल्ह्यातील रावेरा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस
शेतकरी कर्जमाफीचे निकष बदलण्याचे संकेतकृषीमंत्री भरणे : तब्बल 56 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ
कर्जमाफीच्या जीआरची होळी! जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांचा सरकारविरोधात तीव्र आक्रोश, सरसकट कर्जमाफीची मागणी!



शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी पंढरपूर येथे आमदार ठेहळीं झरुरी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आम आदमी पार्टीच्या बीड जिल्हा शाखेने पाठिंबा दर्शविला. यानिमित्ताने पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक अशोक येडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन नैतिक समर्थन जाहीर केले.
यावेळी अशोक येडे यांनी बीड जिल्ह्यात आम आदमी पार्टीच्या वतीने शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर राबविण्यात आलेल्या विविध आंदोलनांची माहिती दिली. केळवाटो आंदोलन, गाजर आंदोलन, आसूड आंदोलन तसेच शेतकरी हिताच्या विविध मुद्द्यांवर पक्षाने केलेल्या संघर्षाचा त्यांनी आढावा घेतला. रोहित पवार हे शेतकर्‍यांची कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, कृषी क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न आणि शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट देत आंदोलनाला नैतिक समर्थन दिले. या प्रसंगी सय्यद सादिक (शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड), राजेंद्र आमटे (शेतकरी हक्क मोर्चा), आकाश आमटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना अशोक येडे म्हणाले, शेतकर्‍यांच्या हक्कासाठी जे कोणी संघर्ष करत आहेत, त्यांच्या पाठीशी आम आदमी पार्टी सदैव ठामपणे उभी राहील. शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या प्रत्येक लोकशाही मार्गावरील आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील.

COMMENTS