Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यावर पुढील चार दिवस अस्मानी संकट; अनेक जिल्ह्यांत गारपीट व वादळी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने उग्र रूप धारण केले असून पुढील आज बुधवारपासून पुढील चार दिवस अर्थात 4 एप्रिलपर्यंत परिस्थिती आणखी गंभीर राहण्याचा अ

वारी येथे ‘महिला शक्ती’च्या हस्ते पाणपोईचे लोकार्पण
मुस्लिम आरक्षण एल्गार मोर्चाला सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबामोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन-डॉ.गणेश ढवळे
अकोलेत हॉटेल, ढाब्यांची झाडाझडती
The current image has no alternative text. The file name is: IMG-20260313-WA0002-696x380-1.jpg

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने उग्र रूप धारण केले असून पुढील आज बुधवारपासून पुढील चार दिवस अर्थात 4 एप्रिलपर्यंत परिस्थिती आणखी गंभीर राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विविध भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पुणे, नाशिक, धुळे, जळगाव तसेच मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गारांच्या तडाख्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकर्‍यांच्या हाती आलेले पिक नुकसानाच्या विळख्यात सापडले आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे दुपारनंतर वादळी वारे आणि विजांसह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. साधारणतः चार एप्रिलनंतरच या स्थितीत काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये पावसाचा प्रभाव अधिक तीव्र राहणार आहे. गारपिटीमुळे फळबागा, भाजीपाला तसेच रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वादळी वार्‍याचा वेग वाढल्याने झाडे उन्मळून पडणे, घरांची पत्रे उडणे अशा घटनाही घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

COMMENTS