https://youtu.be/r-2T0EcAFdg जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांनी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात, आक्रमक होत सरकारच्या कर्जमाफी योजनेच्या जीआरची होळी क
जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांनी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात, आक्रमक होत सरकारच्या कर्जमाफी योजनेच्या जीआरची होळी केली आणि तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटींमुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याने हा संताप व्यक्त होत आहे. निवडणुकीत ‘सरसकट कर्जमाफी’चे आश्वासन देऊन सरकारने आता मात्र फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला. या आंदोलनादरम्यान युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तरुण पिढी रस्त्यावर उतरली असून सरकार तरुणांच्या आणि शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहत असल्याचे पाटील म्हणाले. जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत, तर तरुण वर्ग अधिक आक्रमक होईल, असा सज्जड दमही त्यांनी दिला. या आंदोलनात कर्जमाफीसोबतच, वादळाने नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना आर्थिक मदत आणि २०२५ चा थकीत पीक विमा तातडीने देण्याची मागणी करत, मागण्या मान्य न झाल्यास याहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. निवेदन देतेवेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

COMMENTS