बीड: अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अ, ब, क, ड उपवर्गीकरणाचा मुद्दा उपस्थित करून ५९ जातींमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र राज्यकर्त्यांकडून केले जात अ

बीड: अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अ, ब, क, ड उपवर्गीकरणाचा मुद्दा उपस्थित करून ५९ जातींमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र राज्यकर्त्यांकडून केले जात असल्याचा आरोप रिपाइं पदाधिकार्यांनी केला आहे. या उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार तसेच युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष व रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करून ५९ जातींना मिळालेले आरक्षणाचे हक्क अबाधित ठेवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे.
या आंदोलनात रिपाइंचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि सर्व आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड यांनी केले आहे. यावेळी बापू पवार, अविनाश जोगदंड, संभाजी गायकवाड, महेश आठवले, विलास जोगदंड, भैय्या मस्के, मनोज बोराडे, महेंद्र वडमारे, अॅड. सुरेश वडमारे, भैय्या साळवे, धम्मा पारवेकर, अक्षय कोकाटे, पप्पू वाघमारे, आप्पा मिसळे, गौतम कांबळे, संजय हनवते, दीपक कांबळे, दयानंद उजगरे, सोनू वडमारे, अजिंक्य वडमारे, नागेश दुबळे, शाम वीर, सनी जोगदंड, के. के. कांबळे, जितू धन्वे, गणेश वडमारे, सचिन वडमारे आदींनी आंदोलनास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS