पंजाबात राजकीय उलथापालथ… कॅप्टन अमरिंदरसिंगांनी स्थापन केला नवा पक्ष

Homeताज्या बातम्यादेश

पंजाबात राजकीय उलथापालथ… कॅप्टन अमरिंदरसिंगांनी स्थापन केला नवा पक्ष

प्रतिनिधी : चंदिगढ पंजाबमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले आहे. सिंग यांनी काँग्रेस विरोधात आक्

थकीत देयकांसाठी ठेकेदारांचे आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन
रक्षाबंधनपूर्वी बहिणीची भावाला अनोखी भेट, यकृत दान करत वाचवला जीव
दिल्ली परिसरात भूकंपाचे धक्के

प्रतिनिधी : चंदिगढ

पंजाबमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले आहे. सिंग यांनी काँग्रेस विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली.

त्यामुळे येत्या काळात काँगेसची डोकेदुखी वाढणार आहे. पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभेसाठी कॅप्टन यांचा नवीन पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

आगामी निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार की आघाडी करणार याचे उत्तर तुम्हाला येणाऱ्या काळात मिळेल. पक्षाच्या नावाची घोषणा लवकरच होईल. कारण आमचे वकील निवडणूक आयोगासोबत या संदर्भात चर्चा करीत आहेत. 

पंजाबमधील सर्वच्या सर्व ११७ जागा आमचा पक्ष लढवेल. आमच्यासोबत अनेक काँग्रेस नेते आहेत. पक्षाची स्थापना झाल्यानंतर या नेत्यांची नावे आम्ही जाहीर करू, असा गौप्यस्फोटही अमरिंदरसिंग यांनी केला आहे.

भाजपसोब युती करण्याच्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केले. आमचा पक्ष जागावाटपाच्या संदर्भात प्रस्ताव आल्यास विचार करेल. 

परंतु, आम्ही भाजपसोबत जाणार आहोत, असे आम्ही कधीच म्हटले नाही, असेही कॅप्टन म्हणाले. यासंदर्भात भाजपकडूनही प्रतिक्रिया आली आहे.

आम्ही अमरिंदरसिंग यांच्याशी आघाडी करण्यास तयार आहोत. याबाबतचा अंतिम निर्णय आमचे संसदीय मंडळ घेईल. 

देशातील सर्वसामान्य जनतेचे हित जोपासणाऱ्या गटांसोबत हात मिळवण्यासाठी भाजप सदैव तयार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे पंजाब प्रभारी दुष्यंत गौतम यांनी दिली आहे.

COMMENTS