Homeताज्या बातम्या

के.एस.पी. विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा; बालवारकऱ्यांच्या गजराने परिसर भक्तिमय, विद्यार्थ्यांना फराळ वाटप

बीड: कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय, बीड येथे आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. चिमुकल्या विद्यार्थ्यांन

नागापूर (खुर्द) येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे विधी साक्षरता व विधी सेवा शिबिर संपन्न
भारत-अमेरिका करार अंतिम टप्प्यात! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २०२७ च्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड: कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय, बीड येथे आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक देखाव्यांनी, भगव्या पताकांनी आणि वारकरी वेशभूषेने कालिका नगर परिसर भक्तिमय झाला होता.

या दिंडीत टाळकरी विद्यार्थी, नऊवारी साडी परिधान केलेल्या मुली, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत नरहरी महाराज, संत चोखामेळा आणि संत तुकाराम आदी संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. हातात भगवे ध्वज घेऊन विद्यार्थी वारकरी परंपरेचे अप्रतिम दर्शन घडवत होते. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल भक्तीगीतांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक नृत्यांना उपस्थित नागरिक व पालकांनी उत्स्फूर्त दाद दिली. पालकांनी विद्यार्थ्यांच्या या कलागुणांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले, तर परिसरातील नागरिकांनी ठिकठिकाणी दिंडीचे भव्य स्वागत केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक) विभागाचे प्रमुख ऋषिकेश शेळके तसेच संस्थाध्यक्षा अंजलीताई शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. प्रभारी मुख्याध्यापक विशाल सुपेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

COMMENTS