मनपा शाळेमध्ये वाचक विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्याचा सृजनशील उपक्रम

Homeताज्या बातम्या

मनपा शाळेमध्ये वाचक विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्याचा सृजनशील उपक्रम

‘पुलो डिअर’ बालमनाच्या कल्पनापंखांना उभारी देणारे त्रिभाषिक बोलके पुस्तक नांदेड: बालमनाच्या निरागस विश्वाला कल्पनाशक्तीची नवी क्षितिजे देणारे

झाडे लावा-झाडे जगवा; पण वाढलेली झाडे वाचविणार कोण?राजुरीवेस ते माळीवेस मार्गावरील झाडांची मोठ्या प्रमाणात छाटणी; नागरिकांमध्ये नाराजी
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विश्वास नांगरे पाटलांचे समर्थन; मुख्यमंत्री व उद्धव ठाकरेंच्या विमान प्रवासावरही दिली प्रतिक्रिया
एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ; प्रशासन जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र सज्जछत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसादशिबिरे संपली तरी नागरिकांना सेवांचा लाभ कायम मिळणार – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
NANDED WAGHALA CITY MUNICIPAL CORPORATION, NANDED

‘पुलो डिअर’ बालमनाच्या कल्पनापंखांना उभारी देणारे त्रिभाषिक बोलके पुस्तक

नांदेड: बालमनाच्या निरागस विश्वाला कल्पनाशक्तीची नवी क्षितिजे देणारे आणि वाचनासोबतच भाषिक कौशल्यांचाही सहज विकास घडविणारे ज्येष्ठ लेखिका तथा संवेदनशील शिक्षिका आशा दमयंती देविदास पैठणे यांचे ‘पुलो डिअर’ आणि इतर कथा हे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक नुकतेच वाचकांच्या भेटीला आले आहे. लाडोबा प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक केवळ कथासंग्रह न राहता बालविश्वाशी संवाद साधणारे एक समृद्ध, त्रिभाषिक आणि ‘बोलके’ साहित्यकृती म्हणून विशेष ठरत आहे.

२२ जून हा आपला जन्मदिन साधेपणाने आणि अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करत लेखिका आशा पैठणे यांनी आपल्या दत्तक महानगरपालिकेच्या गणेशनगर येथील शाळेत जाऊन या पुस्तकाचे प्रकाशन विद्यार्थ्यांच्या हस्ते केले. कोणताही औपचारिक बडेजाव न करता मुलांनाच या सोहळ्याचे केंद्रस्थान देत त्यांनी वाचन करणार्‍या विद्यार्थ्यांना पुस्तक आणि खाऊ देऊन सन्मानित केले. शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना शिंदे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

दिसायला आकर्षक असलेल्या या पुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ आणि आतील चित्रांकन लक्ष्मीकांत रत्नप्रभा विजय काळे यांनी साकारले असून, संतोष शंकर खुतवड यांनी केलेली अंतरंग मांडणी पुस्तकाच्या सौंदर्यात भर घालणारी ठरली आहे. मुलांच्या कल्पनाविश्वाला साद घालणारी कृष्णधवल चित्रे आणि रंगीत मुखपृष्ठ हे पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

‘पुलो डिअर’ हे पुस्तक इतर कथासंग्रहांपेक्षा वेगळे ठरण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याचे त्रिभाषिक स्वरूप. मूळ मराठी कथांसोबत त्यांचे हिंदी आणि इंग्रजी अनुवादही या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. सुप्रसिद्ध बालसाहित्यिक स्वाती कान्हेगावकर यांनी हिंदी अनुवाद, तर डॉ. अश्विनी भोरे यांनी सोप्या आणि सहज इंग्रजीत अनुवाद करून या पुस्तकाला व्यापकता प्राप्त करून दिली आहे. विशेष म्हणजे रसिका तुळजापूरकर-उपळेकर यांच्या आवाजात मराठी कथा ऐकण्याची सुविधाही उपलब्ध असल्याने हे पुस्तक ‘बोलके पुस्तक’ ठरते.

यशदा ज्योती घनश्याम पाटील आणि अनन्या पद्मिनी वेदांत पैठणे या चार वर्षीय चिमुकल्यांनी पुस्तकातील मांजर, रोबोटिक कुत्रा आणि फुलपाखरू या पात्रांशी साधलेली सहज मैत्री लेखिकेसाठी भावस्पर्शी अनुभव ठरली. बालमनाचा अभ्यास करणार्‍या लेखिका म्हणून हा अनुभव अत्यंत महत्त्वाचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हे पुस्तक वाचणार्‍या प्रत्येक मुलाच्या मनाचे पंख निश्चितच उघडतील, असा विश्वास व्यक्त करत आशा पैठणे यांनी हे माफक किमतीतील पुस्तक प्रत्येक पालक, शाळा आणि ग्रंथालयापर्यंत पोहोचावे, असे आवाहन केले आहे. बालसाहित्याच्या क्षेत्रात कल्पकता, भाषिक वैविध्य आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधणारे ‘पुलो डिअर’ हे पुस्तक बालवाचन संस्कृती समृद्ध करणारे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

COMMENTS