Homeताज्या बातम्याअहमदनगर

घरात भरधाव डंपर घुसलाविवाहिता गंभीर; राहुरीतील घटना; घराचे मोठे नुकसान

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील शिलेगाव-केंदळ रोडवरील म्हसे वस्ती येथे रविवारी दुपारी भीषण अपघात घडला. मातीने भरलेला भरधाव डंपर थेट घरात घुसल्याने एका विवाहितेला गंभीर दुखापत झाली असून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डंपर क्रमांक एम एच 16 ऐई 7349 वरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डंपर थेट सुभाष बबन म्हसे यांच्या घराच्या मागील भागावर जाऊन आदळला. भरधाव वेगातील डंपरने घरालगत असलेले बाथरूम आणि किचन अक्षरशः उद्ध्वस्त करत घरात प्रवेश केला. अपघाताचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले.या दुर्घटनेत घरामध्ये असलेल्या रोहिणी सचिन म्हसे (वय ३०) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या दोन्ही पायांना जबर मार लागला असून त्या वेदनेने विव्हळत होत्या. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.अपघातात घराच्या शेडसह बाथरूम, किचन व घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही क्षणांत घडलेल्या या थरारक घटनेमुळे म्हसे कुटुंब हादरले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.स्थानिक नागरिकांनी भरधाव अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

अमृतवाहिनी मॉडेल स्कुलचा दहावीचा १०० टक्के निकाल
रात्री डीजेवर बंदी; राहुरी पोलिसांची कठोर भूमिका 
शेतकऱ्यांनी त्यांचे सातबारे जिवंत करून घ्यावेतप्रांताधिकारी नितीन पाटील ; कर्जतमध्ये ‘महाराजस्व’ शिबीर उत्साहात

COMMENTS