Homeताज्या बातम्या

सालेवडगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत

आष्टी तालुक्यातील सालेवडगाव येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्न श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथ

तर्कशक्ती, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगमह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवपद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने व अभिनेत्री मेघना झुझम यांच्या हस्ते सन्मान
आष्टीत मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेच्या कामांचा आढावाप्रलंबित रस्ते तातडीने पूर्ण करा; दर्जेदार कामांना प्राधान्य-आ.सुरेश धस
भगवान महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग (-ख  चङ) अभ्यासक्रमास शासनाची मान्यताग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होणार सोय



आष्टी तालुक्यातील सालेवडगाव येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्न श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (ठ-थए) कार्यक्रमांतर्गत कृषीदूतांचे आगमन झाले. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत कृषीदूतांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
या कृषीदूतांमध्ये लक्ष्मण बांगर, राम बांगर, विजय पवार, प्रज्वल गायकवाड, रोहित घुले, सूरज गोल्हार, पृथ्वीराज तांबडे आणि गोवर्धन किल्लारू यांचा समावेश आहे. कृषीदूतांनी गावातील शेतकर्‍यांशी संवाद साधत आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, मृदा परीक्षण, जैविक शेती, पीक संरक्षण तसेच विविध शासकीय कृषी योजनांविषयी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. आरसुळ, कृषी कार्यानुभव कार्यक्रम समन्वयक प्रा. रोहिणी शिंदे तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. आर. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (2026-27) अंतर्गत कृषीदूत गावामध्ये विविध कृषी प्रात्यक्षिके, शेतकरी मेळावे, मृदा नमुना संकलन, पीक सल्ला तसेच जनजागृतीपर उपक्रम राबविणार आहेत. यावेळी गावाचे सरपंच महेश कराळे, माजी सरपंच सचिन डोके यांच्यासह ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषीदूतांच्या आगमनामुळे शेतकर्‍यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती प्रत्यक्ष मिळणार असून शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचवून शेती अधिक उत्पादनक्षम व शाश्वत बनविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे कृषीदूतांनी यावेळी सांगितले.
———-

COMMENTS