कर्जत : आजही शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर अनेक वेगवेगळ्या नोंदी अनावश्यक पणे झालेल्या दिसून येतात. याकडे दुर्लक्ष करू नका. आपले सातबारे तात्काळ दुरुस्त करून घ्या म्हणजेच जिवंत करून घ्या असे आवाहन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी कर्जत येथे बोलताना प्रतिपादन केले. महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर कर्जत येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय दाखले, प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली. अनेक लाभार्थ्यांना तत्काळ दाखल्यांचे वितरण करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी नितीन पाटील हे होते. यावेळी नगराध्यक्ष रोहिणी घुले, अनिल गदादे, प्रभारी तहसीलदार कारंडे, शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी शिंदे, कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अक्षय जायभाय, नायब तहसीलदार शेख, मंडल अधिकारी प्रशांत सोनवणे, कामगार तलाठी प्रशांत जमदाडे, शब्बीरभाई पठान यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र सांगळे यांनी यावेळी दिली. यावेळी अनिल गदादे यांनी राज्य शासनाच्या योजनांची माहिती दिली. यावेळी कार्यक्रमाची प्रस्ताविक नायब तहसीलदार कारंडे यांनी केले, सर्व उपस्थितांचे आभार प्रशांत सोनवणे यांनी मानले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या जनहिताच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले.

कर्जत : आजही शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर अनेक वेगवेगळ्या नोंदी अनावश्यक पणे झालेल्या दिसून येतात. याकडे दुर्लक्ष करू नका. आपले सातबारे तात्काळ दुरुस्त करून घ्या म्हणजेच जिवंत करून घ्या असे आवाहन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी कर्जत येथे बोलताना प्रतिपादन केले.
महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर कर्जत येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय दाखले, प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली. अनेक लाभार्थ्यांना तत्काळ दाखल्यांचे वितरण करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी नितीन पाटील हे होते. यावेळी नगराध्यक्ष रोहिणी घुले, अनिल गदादे, प्रभारी तहसीलदार कारंडे, शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी शिंदे, कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अक्षय जायभाय, नायब तहसीलदार शेख, मंडल अधिकारी प्रशांत सोनवणे, कामगार तलाठी प्रशांत जमदाडे, शब्बीरभाई पठान यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र सांगळे यांनी यावेळी दिली. यावेळी अनिल गदादे यांनी राज्य शासनाच्या योजनांची माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमाची प्रस्ताविक नायब तहसीलदार कारंडे यांनी केले, सर्व उपस्थितांचे आभार प्रशांत सोनवणे यांनी मानले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या जनहिताच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले.

COMMENTS