Homeताज्या बातम्याअहमदनगर

समजूतदारपणा हीच मोठेपणाची खरी ओळखमहंत उद्धव महाराज मंडलिक ; देवळाली प्रवरा येथे श्रीराम कथेची सांगता

देवळाली प्रवरा : “गोकुळीच्या सुखा, अंतपार नाही लेखा..” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातून महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी भाविकांना अध्यात्म, संस्कार आणि नात्यांतील त्याग यांचे महत्त्व पटवून दिले. “मोठी माणसे मोठी होतात कारण त्यांच्यात लवचिकता असते. वेळेनुसार वागणे-बोलणे आणि समजूतदारपणा हीच मोठेपणाची खरी ओळख आहे,” असे सांगत त्यांनी जीवनातील व्यवहार आणि अध्यात्म यांची सुंदर सांगड घातली.देवळाली प्रवरा येथे तब्बल ३४ वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम कथेची सांगता काल महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात झाली. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या रसाळ व ओजस्वी वाणीतून रंगलेल्या श्रीराम कथेने सात दिवस भाविकांना अध्यात्मिक आनंदाची अनुभूती दिली.पुढे महाराजांनी “अध्यात्मिक आनंद हा इंद्राच्या वैभवालाही कमी पाडणारा असतो,” असे सांगताना त्यांनी देवभक्तीतील प्रामाणिकपणाचे महत्त्व अधोरेखित केले.“देव हा बाजारातील भाजीपाला नाही,”या शब्दांत त्यांनी श्रद्धेचा दिखावा न करता अंतःकरणातून भक्ती करण्याचा संदेश दिला.धार्मिक कार्यक्रमांना काही ठिकाणी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगताना देवळाली प्रवरा गावातील धार्मिक एकोप्याचेही त्यांनी कौतुक केले. “या गावात धार्मिक कार्यक्रमात सर्वजण सहभागी होतात, ही गावाची मोठी ताकद आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

आक्रमक महिलांनी ग्रामपंचायतला ठोकले टाळे राहुरी खुर्दमध्ये पाणीप्रश्न पेटला ; तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
चर्च कारवाईविरोधात ख्रिस्ती समाज आक्रमकप्रशासनाच्या भूमिकेवर सवाल ; मंत्री आठवलेंकडे मांडली व्यथा
देवळालीत हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा चौघांवर गुन्हा ; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

COMMENTS