Homeताज्या बातम्या

मुंबईतील मिरा रोड येथे अमानुष मारहाणीत ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; आईच्या प्रियकराला पोलिसांकडून अटक

मुंबई : मुंबईतील मिरा रोड येथे आईच्या कथित बॉयफ्रेंडने तिच्या ४ वर्षांच्या निरागस मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या

मुंबईत ‘रंगशारदा’ हॉटेलवर ईडीची मोठी कारवाई; तब्बल ३३२ कोटींची मालमत्ता जप्त, आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका
मुंबई पोलीस दलात तब्बल ६.४१ कोटींचा वेतन घोटाळा उघड; दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मोठी कारवाई
भोंदू अशोक खरातला मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई; कोट्यवधींची रोकड, दागिने आणि आलिशान मोटार जप्त
Thane Crime: संतापजनक! आईच्या प्रियकराने ४ वर्षीय चिमुकल्याची अमानुष मारहाण  करून घेतला जीव; नैसर्गिक मृत्यूचा केला बनाव | Navarashtra

मुंबई : मुंबईतील मिरा रोड येथे आईच्या कथित बॉयफ्रेंडने तिच्या ४ वर्षांच्या निरागस मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलाच्या आईचा बॉयफ्रेंड शंभू शर्मा याला अटक केली असून, त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृत मुलाची आई आणि शंभू शर्मा हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Live-in Relationship) राहत होते. घटनेच्या दिवशी आरोपी आणि चिमुरडा दोघेच घरात हजर होते. त्यावेळी क्षुल्लक कारणावरून आरोपीने मुलाला अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे.

या गंभीर मारहाणीत चिमुरड्याला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मिरा रोड परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून काशिमिरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

COMMENTS