कर्जत : रयत शिक्षण संस्थेमार्फत उत्कृष्ट व सर्वोत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल प्रदान करण्यात येणारे मानाचे “कर्मवीर पारितोषिक” यंदा उत्तर विभागातील सौ. सोनाबाई नामदेवराव सोनमाळी कन्या विद्या मंदिर या विद्यालयास बहाल करण्यात आले. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथे आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा मानाचा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, संस्थेचे चेअरमन चंद्रकात दळवी, खासदार सुप्रिया सुळे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार तसेच जनरल बॉडी सदस्य राजेंद्र फाळके, उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांच्या शुभहस्ते विद्यालयास प्रदान करण्यात आला.पुरस्कार स्वीकारताना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका महेजबीन पठाण, पर्यवेक्षक दादासाहेब गलांडे तसेच विद्यालयाचे सर्व सेवकवृंद उपस्थित होते. विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास, विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि संघटित कार्यपद्धतीच्या बळावर हा बहुमान संपादन केला आहे. विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्वत्र विद्यालयाच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.

COMMENTS