Homeताज्या बातम्या

लोकसहभागातून जि.प. शाळेचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी; माहूर येथील शालेय व्यवस्थापन समितीचा स्तुत्य उपक्रम

माहूर: माहूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर शाल

ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट! ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा दिमाखात शुभारंभ
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींचे पंतप्रधान निवासाबाहेर ठिय्या आंदोलन, खासदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात
कोल्हापूरच्या राजकारणात टक्केवारीचा बॉम्ब! आमदार राजेश क्षीरसागरांचा कथित कमिशन व्हिडिओ व्हायरल
Drinking Water, Sanitation and Hygiene in Schools | Samarpann

माहूर: माहूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर शालेय व्यवस्थापन समितीने लोकसहभागाच्या माध्यमातून कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. समितीच्या पुढाकारातून शाळेच्या परिसरात २१५ फूट खोल बोअरवेल खोदण्यात आली असून या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मराठी माध्यमाचे १७८ आणि उर्दू माध्यमाचे १३४ असे एकूण ३१२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळेत पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. मागील उन्हाळ्यात शालेय व्यवस्थापन समितीने जारमधून थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची तात्पुरती सोय केली होती.

या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून समितीचे अध्यक्ष प्रशांत लाड, सदस्य गजानन कुळकर्णी व इतर सदस्यांनी लोकसहभागातून निधी उभारून शाळेच्या आवारात २१५ फूट खोल बोअरवेल खोदली. सुमारे १८० फूट खोलीवर मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे.

या बोअरवेलवर विद्युत पंप बसविण्यासाठी भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपू महामुने, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंजाब शिंदे, मुख्याध्यापक संजय वाठोरे, शाळेतील शिक्षक-शिक्षिका, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच अंगणवाडी सेविकांनी आर्थिक योगदान दिले आहे. या लोकसहभागामुळे विद्यार्थ्यांना आता वर्षभर स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध होणार असून शालेय व्यवस्थापन समितीच्या या कार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

COMMENTS