Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाई शहराच्या पाणीपुरवठा विस्कळीत

सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

अंबाजोगाई प्रतिनिधी - ऐन उन्हाळ्यात आणि सणासुदीच्या काळात अंबाजोगाई शहराला 10 ते 15 दिवसांला पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक हवालदिल असून नगर प

भाजपमध्ये गेलेल्यांची आ. रोहित पवारांनी काळजी करू नये
अकोले शहरात विविध उपक्रमांनी श्रीराम नवमी उत्साहात साजरी
शिवसेना खा. राऊत यांच्या नावाने करणार दशक्रिया विधी

अंबाजोगाई प्रतिनिधी – ऐन उन्हाळ्यात आणि सणासुदीच्या काळात अंबाजोगाई शहराला 10 ते 15 दिवसांला पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक हवालदिल असून नगर परिषद प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पाण्याअभावी होणार्‍या नागरिकांच्या हालअपेष्टा लक्षात घेत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी मंगळवारी  (दि.11) कार्यकर्त्यांसह नगर परिषदेत जाऊन प्रशासनाला धारेवर धरत मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले.
अंबाजोगाई शहराचा पाणी पुरवठ्याच्या प्रश्न बिकट बनलेला आहे. शहरात कोणत्याही भागात नियमित व सुरळीत होत होत नाही. गेल्या काही दिवसांपासून महिन्यातुन दोनदा तर पंधरा दिवसांतुन एकदा पाणी पुरवठा होत आहे. पाणी पुरवठा करणारी यंत्रणा ही संपूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ठिकठिकाणी पाईपलाईन फुटल्या आहेत. सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील जवळ आली आहे. अक्षय तृतीया व रमजान ईद असे मोठे सण येत्या दिवसांत आहेत. नेमके सध्या सणासुदीचे दिवस सुरु असताना शहराला 10 ते 15 दिवसांला पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या हालअपेष्टा लक्षात घेत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांसह नगर परिषदेत धाव घेतली आणि न.प. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.  यावेळी त्यांनी फुटलेल्या पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, तुंबलेली गटारे साफ करावी, गल्लोगल्ली स्वच्छता मोहीम राबवावी, घंटागाडी सुरळीत करावी, वराहांचा आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा असे निवेदन मुख्याधिकार्‍यांना दिले. यावेळी मुंदडा यांच्यासमवेत माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम, सारंग पुजारी, अनंत लोमटे, माजी नगरसेवक सुरेश कराड, संजय गंभीरे, कमलाकर कोपले, दिलीप सांगळे, महादू मस्के, बाला पाथरकर, खलील मौलाना, ताहेरभाई, हनुमंत तौर, राजेश वाहूळे, प्रशांत आदनाक,  डॉ. निशिकांत पाचेंगावकर, दिग्विजय लोमटे व राजपाल सारडा उपस्थित होते.
मुंदडांच्या झाडाझडतीचा झटपट परिणाम – दरम्यान, मुंदडा यांनी घेतलेल्या पावित्र्याचा लगोलग परिणाम दिसून आला. पाणी सहा ते आठ दिवसाला देण्याचे, लिकेज आढळून आल्यास एकाच दिवसात काढण्याचे मुख्याधिकार्‍यांनी मान्य केले आहे. तसेच, मोठे नाले खरडून साफ करण्यात येणार असून डुकरे आणि भटके कुत्रे पकडण्याचे कंत्राटही चालू आठवड्यात काढण्यात येणार आहे.

COMMENTS