Homeताज्या बातम्या

सालाना बरसीनिमित्त नागिणा घाट परिसराला जत्रेचे स्वरुप : हजारो भाविक झाले सहभागी

नांदेड : सालाना बरसीनिमित्त नागिणा घाट परिसराला जत्रेचे स्वरुप झाले होते. देश विदेशातून हजारो भाविक या कार्यक्रमाला उपस्थित होते. लंगर साहिबचे सं

राजा रघुवंशी हत्याकांडातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीचा जामीन रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका
धोरणातील दोषामुळे पीक विमा भरणार्‍यांची संख्या घटली; किसान सभेचा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी
जिल्हा परिषद शाळेपासून AIIMS पर्यंत भरारी; नरसीच्या तपस्या पुलचवाडची NEET 2026 मध्ये देशात ११२० वी रँक

नांदेड : सालाना बरसीनिमित्त नागिणा घाट परिसराला जत्रेचे स्वरुप झाले होते. देश विदेशातून हजारो भाविक या कार्यक्रमाला उपस्थित होते. लंगर साहिबचे संस्थापक संतबाबा निधानसिंघ जी, संत बाबा हरनामसिंघ जी, संत बाबा आत्मासिंघ जी व संत बाबा शिशासिंघ जी कारसेवावाले यांची सालाना बरसी 4 ऑगस्ट रोजी नांदेड येथे लंगरसाहिब गुरुद्वाराच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. लंगरसाहिबचे प्रमुख जत्थेदार संत बाबा नरेंद्रसिंघ जी व संत बाबा बलविंदरसिंघ जी यांच्या पुढाकाराने हा उत्सव आयोजित केला होता. बरसीनिमित्त कीर्तन, प्रवचन, रागी जत्थे, लंगर महाप्रसाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सचखंड गुरुद्वाराचे मुख्य पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ व पंचप्यारे साहेबांन, संत बाबा गुरूदेवसिंघ शहिदीबाग आनंदपूर साहिब, संत बाबा बालवीर सिंघ जी 96 करोडी, संत बाबा जगतारसिंघ जी तरनतारनवाले, संत बाबा जित सिंघ जी जोहला वाले, संत बाबा जोगासिंघ जी करनालवाले, संत बाबा बुद्धसिंघ जी नीके घुमनावाले, संत बाबा गुरपिंदरसिंघ जी सतलानी, संत बाबा, माता साहिब गुरुद्वाराचे जत्थेदार संत बाबा तेजासिंघ यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रसिद्ध कथाकार ज्ञानी पिंदरपालसिंघ यांच्या कथेने भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले. भारतीय संस्कृतीत गुरूंना अत्यंत आदरणीय स्थान आहे. गुरूची भूमिका समाजाला योग्य दिशा दाखवण्यात यशस्वी राहिली आहे, असे सांगून संत बाबा नरेंद्रसिंघ यांनी शीख पंथात गुरुग्रंथसाहिब यांनाच गुरू मानले जाते आणि ते सर्वश्रेष्ठ आणि परिपूर्ण गुरू आम्हाला लाभले आहेत, याचा शीख पंथाला गर्व वाटतो असे ते म्हणाले. लंगरसाहिबच्या महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करीत कार सेवा सुरू राहणार असल्याचे त्यांनी प्रतीपादित केले. या कार्यक्रमात पंजाब, दिल्ली, हरियाणा, हैद्राबाद मुंबई येथील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानिमित्त पंजाब सह देश विदेशातील अनेक संत महापुरुष व भक्त मंडळी या उत्सवात सहभागी होण्यासाठी नांदेड येथे दाखल झाले होते. नागिणा घाट परिसराला यामुळे जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. भारतीय किसान युनियनचे नेते श्री राकेश टिकैत यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी पंजाब चे शेतकरी ही मोठ्या संख्येने उपस्थित होती. दरम्यान वडे पुरी येथे उभारण्यात आलेल्या रतनगड गुरुद्वारा चे उद्घाटन करण्यात आले. सुंदर देखणा असा गुरुद्वारा लंगर साहिब च्या वतीने निर्मित करण्यात आला आहे.

COMMENTS