अर्धापूर : शहरातील एज्युव्हिजन व न्यू इरा किड्स इंग्लिश स्कूलमध्ये ‘यमी टम्मी’ या संकल्पनेवर आधारित आनंदनगरी कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्

अर्धापूर : शहरातील एज्युव्हिजन व न्यू इरा किड्स इंग्लिश स्कूलमध्ये ‘यमी टम्मी’ या संकल्पनेवर आधारित आनंदनगरी कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावे, पैशाचे महत्त्व समजावे तसेच मेहनतीचे मूल्य आणि व्यवसायाची प्राथमिक ओळख प्रत्यक्ष अनुभवातून व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या आनंदनगरीत शाळेतील लहानग्यांपासून ते मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल उभारले होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सवलती, विशेष ऑफर्स यांसारख्या कल्पक योजना राबवल्या. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमात एकूण 124 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला पालकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. अनेक पालकांनी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांच्या आनंदात सहभागी झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कै. शंकरअप्पा रावते बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा रेखाताई रावते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांतून सिंग यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विज्ञान प्रमुख अशितोष पुरी यांच्यासह शिक्षिका किरण क्षीरसागर, रोहिणी शिंदे, कोमल डांगे, स्वाती माने, शिवरानी पत्रे, स्वाती पांचाळ, ममता हटेकर, अलका धुमाळ, मनीषा सिंग, तसेच सेविका अर्चना रासवंते, कविता गाडेकर आणि लक्ष्मी कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे शाळेच्या प्राचार्या प्रिया रावते व संचालक प्रवीण रावते यांनी कौतुक करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS