Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगदी रक्कम व सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रामाणिकपणे परत; शंकर कंगारे यांचा माणुसकीचा आदर्श

अर्धापूर : पत्रकार शंकर गंगाराम कंगारे यांनी प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून देत नगदी रक्कम व सोन्याचे दागिने असलेली हरवलेली बॅग मालकाला परत केली. त्

अर्धापूर पोलिसांची धडक कारवाई; 7.82 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व कार जप्त, दोघांना अटक
विवाहित महिलेस आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल
अवकाळी पावसाचा नांदेड जिल्ह्याला तडाखा; नांदला-दिग्रस परिसरात केळी बागांचे मोठे नुकसान

अर्धापूर : पत्रकार शंकर गंगाराम कंगारे यांनी प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून देत नगदी रक्कम व सोन्याचे दागिने असलेली हरवलेली बॅग मालकाला परत केली. त्यांच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील गाडीपुरा बडी दर्गा परिसरात राहणारे शेख नदीम शेख अकिम हे आपल्या कुटुंबासह औंढा येथून मोटारसायकलने नांदेडकडे जात होते. दरम्यान, पासदगावजवळ त्यांच्या कॅरीबॅग खाली पडली. या बॅगेत सुमारे 70 हजार रुपये रोख रक्कम, सोन्याचे हार, गंठण, तीन अंगठ्या, इतर दागिने व कपडे असा सुमारे 8 तोळे सोन्याचा ऐवज होता. दरम्यान, नांदेडकडे जात असताना ही बॅग पत्रकार शंकर कंगारे यांना सापडली. बॅग कोणाची आहे याचा शोध घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अखेर संबंधित व्यक्तीचा शोध लागल्यानंतर कंगारे यांनी सुमारे 15 लाख रुपये किमतीचा ऐवज प्रामाणिकपणे परत केला. या प्रामाणिकपणाबद्दल शेख नदीम यांनी कंगारे यांचा शाल, श्रीफळ व मिठाई देऊन सत्कार केला. शंकर कंगारे यांच्या या कृतीमुळे समाजात माणुसकीचे उत्तम उदाहरण समोर आले असून सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

COMMENTS