Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे तीन दिवसीय संविधान साक्षरता निवासी कार्यशाळा

नाशिक :  भारतीय राज्यघटनेतील समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधूता तसेच मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि संविधानिक मूल्यांची रुजवणूक करून सुजाण नागरिक घडविण्

साहित्यातूनच शेतकरी आणि दलितांना उभे राहण्याचे सामर्थ्य मिळाले  
नगरच्या विकासासाठी कुणाशीही आघाडी करायला आम्ही तयार-खासदार सुजय विखे | आपलं नगर | LokNews24 |
..तर मग, मुख्यमंत्री व मंत्र्यांचे मानधन बंद करा…

नाशिक :  भारतीय राज्यघटनेतील समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधूता तसेच मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि संविधानिक मूल्यांची रुजवणूक करून सुजाण नागरिक घडविण्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला अध्यासनाच्या माध्यमातून योगदान देता यावे या उद्देशाने मुक्त विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे दिनांक 27 ते 29 ऑक्टोबर, 2023 याकालावधीत तीन दिवसीय संविधान साक्षरता निवासी कार्याशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन मुक्त विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांचे हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी केले. त्यांनी अध्यासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.  याप्रसंगी उपस्थित सहभागींना मार्गदर्शन करतांना माननीय कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, संविधानाचा प्रचार आणि प्रसार करणारे तुम्ही खरे दूत आहात आणि याकरता आपण नेहमी कृतीशील असायला हवे असेही त्यांनी सांगितले. सहभागींना त्यांनी या कार्यशाळेचा तुम्हाला निश्चितच उपयोग होईल असे सांगून त्यांनी कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या.   

कार्यशाळेस तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून श्री. नागेश जाधव, मुंबई, ॲड. निलेश खानविलकर, मुंबई, श्रीमती नीलम पंडित, पुणे, श्री. अझरूद्दीन पटेल, सातारा हे विविध सत्रात प्रशिक्षण देणार आहेत.या कार्यशाळेस एकूण 40 सहभागींनी आपला सहभाग नोंदवला आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय खरात यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे कर्मचारी तसेच विद्यापीठाचे इतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS