Homeताज्या बातम्या

कामठा येथील शेतकर्‍यांनी पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही..आठ दिवसापूर्वी पेरलेले सोयाबीन अद्याप उगवले नाही.

 तालुक्यातील कामठा बु. येथील शेतकर्‍यांनी आपल्या शेतामध्ये दोन बॅग सोयाबीनची पेरणी केली पण सोयाबीन निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्यामुळे उगवले नसल्या

तुटणारे संसार जोडणारे अर्धापूर केंद्र; 1 हजार 778 प्रकरणांत यशस्वी समेट
शासकीय योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा-तहसीलदार रेणुकादास देवणीकरपार्डी (म) येथे विकसित भारत अभियानांतर्गत गावफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची कसोटीअशोकराव चव्हाण-प्रतापराव पाटील चिखलीकर यांची मैत्री कायम राहणार?



 तालुक्यातील कामठा बु. येथील शेतकर्‍यांनी आपल्या शेतामध्ये दोन बॅग सोयाबीनची पेरणी केली पण सोयाबीन निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्यामुळे उगवले नसल्याचा आरोप  शेतकर्‍यांनी कंपनीच्या विरोधात तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दि. 7 मंगळवारी रोजी केली आहे.
अर्धापूर तालुक्यातील कामठा बु. येथील शेतकरी परमेश्वर विश्वनाथ गाढवे यांनी दि.30 जून रोजी महाबीज या कंपनीचे बियाणे बीबीएफ पद्धतीने यंत्रणाच्या सहाय्याने पेरणी केली होती. सात ते आठ दिवसाचा कालावधी उलटला तरीही त्यांच्या शेतामध्ये बीज अंकुरण झाले नाही. या कंपनीचे बियाणे निकृष्ट असल्याचा दावा करत तालुका कृषी अधिकारी अर्धापूर यांना सदर प्रकरणी पाहणी करून कंपनी विरोधात योग्य ती कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन शेतकरी परमेश्वर गाढवे यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दिला आहे. यावे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रहारचे तालुकाध्यक्ष छगन सांगोळे म्हणाले की महाबीजने शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. ऐन हंगामात शेतकर्‍यावर दुबार पेरणीची वेळ आणणार्‍या बियाणे कंपनीवर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. कृषी विभागाने तत्परतेने बांधावर जाऊन पाहणी करून शेतकर्‍याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अन्यथा प्रहार स्टाईलने कृषी अधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडेल जाईल असा इशारा सांगोळे यांनी दिला.

COMMENTS