Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छ.संभाजीराजेंच्या पत्नीला वेदोक्त मंत्रोच्चारापासून रोखले

नाशिक येथील काळाराम मंदिरातील घटना

नाशिक/प्रतिनिधी ः महाराष्ट्राला वेदोक्त आणि पुराणोक्त वाद नवा नाही. कोल्हापुरच्या छत्रपती शाहु महाराजांना वदोक्त मंत्रोच्चारापासून रोखल्यानंतर मह

न्यु हिंदुस्थान कामगार सेनेच्या उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी योगेश पाटील  
Indapur : गांजा तस्करी करणारा पोलिसांच्या अटकेत (Video)
वैनगंगा नदीत 6 महिल्या बुडाल्या

नाशिक/प्रतिनिधी ः महाराष्ट्राला वेदोक्त आणि पुराणोक्त वाद नवा नाही. कोल्हापुरच्या छत्रपती शाहु महाराजांना वदोक्त मंत्रोच्चारापासून रोखल्यानंतर महाराष्ट्रात नवं वादळ निर्माण झाले होते. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले, संविधानाची अंमलबजावणी झाली असली तरी, जातीपातीच्या भिंती अजूनही गडद असल्याचे दिसून येत आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजाचे कोल्हापूरचे वंशज व माजी खासदार संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगीता राजे यांना वेदोक्त मंत्रोच्चारणास विरोध करण्यात आल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरात हा धक्कादायक प्रकार घडला असून यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

संयोगीताराजे यांनी स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, संयोगीताराजे नुकत्याच नाशिकच्या काळाराम मंदिरात गेल्या होत्या. तिथे मंदिरातील महंतांनी संयोगीताराजेंच्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यास ठामपणे विरोध केला व स्वत: महामृत्युंजय मंत्राचा जप केला. त्यास महंतांनी आक्षेप घेतला. तुम्हाला वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला. महंतांच्या या भूमिकेमुळे संयोगीताराजे संतापल्या. ‘ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही नियम लावत आहात, ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका, अशा शब्दांत त्यांनी महंतांना खडसावले. ’परमेश्‍वराच्या लेकराला, आपल्या ईश्‍वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावून त्यांनी तिथेच रामरक्षेचे पठणही केले. या प्रसंगाबद्दल संयोगीताराजे यांनी आपल्या भावना व्यक्त आहेत. ’शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही, असा प्रश्‍न माझ्या मनात आला. अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे. अजूनही खूप प्रवास बाकी आहे… अजून खूप चालावे लागणार आहे हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे! स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्‍या, परमेश्‍वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धी दे… हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे , असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


आमदार जितेंद्र आव्हाडांचा संताप – हा प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा, छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे भोसले यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्याना सुनावल, छत्रपतीमुळे मंदिर राहिली त्यानाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही.? त्यांनी उत्तर दिले नाही तुम्हाला अधिकार नाही, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तसेच याबद्दल पुढे बोलताना त्यांनी बर झाले हे छत्रपतींच्या वारसाबरोबर झाले. जे मी सांगत होतो तो हाच सनातनी धर्म. आजही ते वर्ण व्यवस्था आहे हे दाखवून देतात अजुन कुठला पुरावा हवा. आजच्या छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते तर बाकीच्यांचे काय? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS