बीड : महादेव कसबे यांनी प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवा बजावत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडले असून त्यां

बीड : महादेव कसबे यांनी प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवा बजावत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडले असून त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे मत नवगण शिक्षण संस्थेचे सचिव तथा भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
बीड तालुक्यातील कानडीघाट येथील नवगण शिक्षण संस्था संचलित हायस्कूलचे मुख्याध्यापक महादेव कसबे यांच्या सेवापूर्तीनिमित्त मंगळवारी गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.योगेश क्षीरसागर हे बोलत होते. यावेळी ह.भ.प. नामदेव महाराज कवडे, माजी पंचायत समिती सदस्य सुनिल झोडगे, सरपंच गोकुळ कुडके, विठ्ठल हांगे, अंबादास पवार, अशोक घुमरे, संतोष घुमरे, नवगण शिक्षण संस्थेचे संचालक आमेर सिद्दीकी, प्रशासक डॉ.व्ही.टी.देशमाने, डॉ.सुधाकर गुट्टे, मुख्याध्यापक लक्ष्मण चंदनशिव, दीपालीताई शेंडगे, शुभम कातांगळे, राजाभाऊ क्षीरसागर, प्रदीप अडागळे, इम्रान जागीरदार, पंकज शिंदे, लालासाहेब घुमरे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, संस्थेच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते कसबे दाम्पत्याचा सन्मान केले. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS