Homeताज्या बातम्या

राहुरी फॅक्टरीत तरुणाची आत्महत्या

देवळाली प्रवरा : राहुरी फॅक्टरी येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाठीमागील परिसरात २२ वर्षीय युवकाने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दु

राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ; नाशिकमध्ये गोदावरीला पूर, पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा होणार निर्णय! सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात; पुढील सुनावणी ४ ऑगस्टला
गावठी कट्टा बाळगणार्‍याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

देवळाली प्रवरा : राहुरी फॅक्टरी येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाठीमागील परिसरात २२ वर्षीय युवकाने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित सोमनाथ बनसोडे (वय १९) हा युवक मंगळवार रात्रीपासून घरातून बेपत्ता होता. कुटुंबीय त्याचा शोध घेत असताना बुधवारी सकाळी इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाठीमागील परिसरातील बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी बाबासाहेब शेळके घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरी यांनीही मदतकार्य करत मृतदेह खाली उतरविण्यास सहकार्य केले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून राहुरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे बनसोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून राहुरी फॅक्टरी परिसरात शोककळा पसरली आहे.

COMMENTS