बीड: शहरातील हॉटेल यशोदा परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरणार्या एका इसमास स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या संयुक्त पथका

बीड: शहरातील हॉटेल यशोदा परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरणार्या एका इसमास स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा सुमारे 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. 4 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सपोनि जनाबाई सांगळे यांच्याकडून माहिती मिळाली की, तुकाराम करांडे नामक इसम स्वराज्यनगर, बीड येथे गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. माहितीची खात्री करून पथकाने हॉटेल यशोदा परिसरात छापा टाकला. यावेळी संशयित तुकाराम गंगाधर करांडे (वय 28, रा. खडकी देवळा, ता. वडवणी, जि. बीड, सध्या रा. स्वराज्यनगर, बीड) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 227/2026 नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम व पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सपोनि जनाबाई सांगळे, पोलीस कर्मचारी शिंदे, येवले, महिला पोलीस कर्मचारी जाधव, चौरे, कारले, गर्जे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि श्रीराम खटावकर, पोलीस कर्मचारी मनोज परजणे व अशफाक सय्यद यांनी सहभाग घेतला.

COMMENTS