देवळाली प्रवरा : देवदर्शनासाठी महिलांची रांग लागलेली असताना त्यामध्ये घुसण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून एका तरुणास जातीवाचक शिवीगाळ करीत मार

देवळाली प्रवरा : देवदर्शनासाठी महिलांची रांग लागलेली असताना त्यामध्ये घुसण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून एका तरुणास जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना ३० जुलै रोजी रात्री राहुरी येथील बुवासिद्ध बाबा मंदिर परिसरात घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील राजू नारद (वय २४, रा. बुवासिद्ध बाबा गल्ली, राहुरी) हे ३० जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बुवासिद्ध बाबा मंदिरात आरतीसाठी गेले होते. त्यावेळी महिलांची दर्शनासाठी रांग लागलेली असताना शाहरुख शेख व आरिफ इनामदार हे महिलांच्या रांगेतून पुढे जात असल्याने निखील नारद यांनी त्यांना मज्जाव केला. त्यातून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला.
त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास निखील नारद हे पुन्हा मंदिराकडे जात असताना आरोपींनी त्यांना अडवून जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. आरडाओरडा ऐकून मित्र घटनास्थळी धावून आल्याने त्यांची सुटका झाली, असेही फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी निखील नारद यांच्या फिर्यादीवरून शाहरुख फारुख शेख, आरिफ आयुब इनामदार, मुसा चांद शेख, मोहसिन उर्फ गोप्या अकबर शेख व शाहबाज उर्फ मुर्गी अन्सार सय्यद (सर्व रा. बुवासिद्ध बाबा गल्ली, राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर करीत आहेत.
होमगार्ड समादेशक आरिफ इनामदारची हकालपट्टी होणार का?

राहुरी तालुका होमगार्ड समादेशक या पदावर आरिफ इनामदार अनेक वर्षापासून प्रभारी कार्यरत आहेत. तालुका होमगार्ड समादेशक पदावर कार्यरत असताना या गुन्ह्याची घटना घडल्याने राज्याच्या होमगार्ड विभागाने व गृह मंत्रालयाने याची गंभीरतेने दखल घेतल्यास त्याला या पदावरून तात्काळ हाकलले जाऊ शकते? विशेष म्हणजे आरिफ इनामदार यांच्यावर हा गुन्हा घडला त्यावेळी ते होमगार्डच्या ड्युटीवर असल्याचीही चर्चा होत आहे. जर ते अधिकृत ड्युटीवर असेल तर त्यांना ड्युटी करताना सिव्हिल ड्रेसवर ड्युटी करता येते का? होमगार्ड समादेशक म्हणून जर ते ड्युटीवर असेल तर बाबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ते आमचे देवस्थान असल्याचे सांगत दमदाटी कसे करू शकतात? याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन दोषी असल्यास आरिफ इनामदार वर कारवाईची गरज आहे.
आरिफ इनामदार पशुसंवर्धन विभागातही नोकरीस
आरिफ इनामदार प्रभारी राहुरी तालुका होमगार्ड समादेशक पदावर कार्यरत असले तरी ते पशुवैद्यकीय विभागातही शिपाई म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने पशुसंवर्धन विभाग देखील त्यांच्यावर काय कारवाई करते याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

COMMENTS